शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

शौकीन पण...! अमेरिकन सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:06 IST

अमेरिकन मद्याचे शौकीन असले तरी त्यांनी त्याला मर्यादेचे कुंपण घालून घेतले आहे. आली तलफम्हणून लावला ग्लास तोंडाला, असे काही इथे होत नाही.

किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सीअमेरिकन मद्याचे शौकीन असले तरी त्यांनी त्याला मर्यादेचे कुंपण घालून घेतले आहे. आली तलफम्हणून लावला ग्लास तोंडाला, असे काही इथे होत नाही. कामावेळी काम आणि सुटीला एन्जॉय अशी इथली पद्धत सर्वच गोष्टींना जणू न्याय देणारी ठरते, हे इथल्या संस्कृतीवरून पाहायला मिळते.मूळ अमेरिकन नागरिक मद्याचा खूप आशिक आहे. वयात आलेले जवळजवळ नव्याण्णव टक्के अमेरिकन स्त्री-पुरुष मद्य घेतात! पण त्याचा अतिरेक मात्र नसतो. केवळ विरंगुळा म्हणून ते घेतले जाते! तेथील वाईन इंडस्ट्री जगातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या वायनरी उद्योगांपैकी एक असावी.. असे असले तरी अमेरिकन माणसाचा स्वभावधर्मच असा आहे की तो आॅफिस कामाशी, व्यवसायाशी पूर्णपणे प्रामाणिक व एकनिष्ठ असतो. यामुळे सोमवार ते शुक्रवार कामाच्या दिवशी या शौकापासून तो दूरच असतो. सुटीदिवशी मात्र तो कुटुंबीयांसमवेत मद्याचा आस्वाद घेतो. तसं म्हटलं तर भारत हाही मद्यनिर्मितीत जगात अग्रभागी असलेल्या काही देशांपैकी एक आहे.

मद्यापासून भारतातील राज्यांना चांगले उत्पन्न मिळते; पण भारतात मद्य घेणे काहीसे अप्रतिष्ठेचे मानले जाते, त्यामुळे येथील बहुतांश दारूची दुकाने छोटी छोटी व कुठेतरी कोपºयात आडवाटेला असतात. अमेरिकेत मात्र स्टेशनरी, किराणा माल, होजिअरी, कपडे, टायर-ट्यूब, खेळणी यांचे जसे स्वतंत्र मॉल दिमाखात उभे आहेत, तसेच लिकरसाठीही भव्य मॉल आहेत. ‘ज्यो कॅनॉल’ नावाने अमेरिकेत प्रसिद्ध असलेल्या महाप्रचंड मॉलमध्ये जाण्याची संधी मिळाली. हा मॉल केवळ आणि केवळ लिकर्सचाच आहे. या मॉलमध्ये जगातील बहुधा सर्वच ‘लिकर प्रोड्युसिंग’ देशातील मद्य मुबलक उपलब्ध आहे.

ब्रँडी, जीन, स्कॉच, व्हिस्की, आदी मॉलच्या भिंतीच शंभर ते दीडशे फूट उंच असाव्यात व तो आठ ते दहा हजार स्क्वे. फूट जागेत उभा असावा. या मॉलमधला एकतृतीयांश भाग केवळ वाईनसाठी राखीव आहे, तर यातील एक भाग बीअरचा व एकेक भाग केवळ व्हिस्की, रम, ब्रँडी, अशा विविध मद्यांच्या प्रकारासाठी आहे. प्रत्येक विभागांत कोणते मद्य आहे? ते किती वर्षांचे आहे, कोणत्या देशाचे आहे इथंपासून त्याच्या अधिकृत किमतीची पाटीही दर्शनी लावलेली असते. या मद्यात बीअर हे मद्य सर्वांत स्वस्त असावे! स्वस्त म्हणजे इतके की पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या किमतीपेक्षा थोडेसेच महाग. यामुळे घरात एखादी पार्टी असेल तर एक तर थेट मोठे क्रेटस् आणले जातात वा बीअरची भलीमोठी टाकीच (लार्ज डिस्पेन्सर्स) आणली जाते. याला तोटीही असते.

यातून प्रत्येकाला हवी तेवढी बीअर घेता येते. येथे मद्याची किंमत ते मद्य किती जुने आहे यावर ठरते..! उदा. एखाद्या कंपनीचे मद्य १० वर्षे जुने असल्यास एखाद्या एक लिटर बाटलीची किंमत १२ डॉलर असेल तर याच कंपनीच्या मद्याची ते २० वर्षे जुने असल्यास केलेली किंमत ४५ डॉलरइतकी असते. इथे बहुतांश अमेरिकेन लोक वाईनच घेतात. म्हणजे असे की वाईन न घेणारा माणूस हा येथील मद्यपींच्या समूहातला कच्चा लिंबू मानला जातो. येथे व्हिस्की विशेष प्रचलित नाही. वाईनखालोखाल रम (कॅप्टन मॉर्गन), व्हाईट रम (बकार्डी) आणि वोडका यांचे सेवन अधिक असते. वाइन थंड राहावी म्हणून मोठ्या जारमध्ये मध्यभागी बाटली ठेवून सभोवताली बर्फ घातले जाते.

येथे व्हिस्कीला ती उंची दर्जाची असल्यास स्कॉच म्हटले जाते. येथे काही स्कॉच व्हिस्की लोकप्रिय आहे. ‘दा ग्लेनफिडीच, जॅक डॅनिअल, केंटूकी, आदी.अमेरिकेत एखाद्या समारंभाला जावयाचे असल्यास भेट म्हणून थेट वाईनची बाटली देण्याची पद्धत आहे. अमेरिकेत वाईन टेस्टिंगचा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. वाईन पिण्याच्या निमूळत्या ग्लासमध्ये ड्राय रोझ, टग बोट, ड्राय रेड अशा व्हरायटी रोचक वाईन या ग्लासच्या पाव टक्के भरल्या जातात. पॅम्प्लेटमधील कोणतीही सहा वाईन सँपल्स चव पाहण्याकरिता दिली जातात. काही ठिकाणी टेस्टिंगसाठी दोन ते तीन डॉलर आकारले जातात; पण यारो.. यांच्या सेवनाची लज्जत काही औरच..!

 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत