शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आनंद, नॉर्मल जीवनातला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 09:09 IST

ललित : सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती.

- सुषमा सांगळे - वनवे

शनिवार सकाळची शाळा असल्यामुळे खूप घाईघाईने आवरून ठीक ६:३० वाजताच मी गाडीत बसले. गाडीत बसल्याक्षणी अंगातून खूप घाम येऊ लागला होता. मुलांचे डबे, ह्यांचा डबा, घरातील सर्व काम आवरून मी शाळेत निघाले होते. खरं म्हणजे माझ्यासारखीच गाडीतील इतर शिक्षिकांचीही परिस्थिती होती. प्रत्येकाचा कुरकुरीचा सूर होता. प्राप्त परिस्थितीवर तसे कोणीही खुश नव्हते. तसे पाहता सर्व गोष्टी सर्वांच्या नॉर्मल होत्या. मी गाडीची काच हळूच वर केली.

सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती. विस्तीर्ण असलेला हायवे मनाच्या कक्षा रुंदावत होता. वनवे ट्रॅकवरून जाणारी आमची गाडी विचारांची दिशा ठरवत होती. रस्त्याच्या बाजूला असलेली गुलाबी, पिवळी फुलझाडे रस्त्याच्या सौंदर्यात भर घालून मोठ्या दिमाखाने  डोलत होती. सर्व गोष्टी तशा रोजच्याच होत्या, पण आजपर्यंत त्या सर्व नॉर्मल गोष्टीकडे माझे लक्ष का गेले नसावे?

खरं म्हणजे या सर्व नॉर्मल गोष्टी एवढ्या सुंदर असूनही आपले त्याकडे मुळीच लक्ष नसते किंवा ते पाहण्याची आपली तयारीही नसते. कारण त्यांना आपण एवढे गृहीत धरलेले असते की त्यांच्यातील आनंद, सौंदर्यच पाहण्याची दृष्टी आपण आपल्या रोजच्या रडगाण्यात विसरून गेलेलो असतो.‘कसे आहात?’ किंवा ‘कसे चालले आहे?’ असा प्रश्न जरी कोणी आपणास विचारला तर आपण ‘ठीक चाललेय’ अशा पद्धतीचे निरुत्साही उत्तर देऊन रिकामे होतो. खरं म्हणजे ‘मस्त आहे’ किंवा ‘मजेत चाललंय’ म्हणायला या लोकांना काय प्रॉब्लेम असतो. जोपर्यंत नॉर्मल गोष्टी या अ‍ॅब्नॉर्मल होत नाहीत तोपर्यंत आपणास त्या नॉर्मल गोष्टीचे महत्त्व पटलेले नसते.

साधे उदाहरण म्हणजे रोजचा प्रवासच बघा. आपण रोज प्रवास करीत असतो, पण त्यातील आनंद हा आपणाला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत काहीतरी आपल्याला विपरीत घडत नाही. एखाद्याचे असणे आपण अगदी गृहीत धरून चालतो, पण त्याच्या असण्याचा आनंद मात्र आपणास घेता येत नाही. परंतु तेच असणे जेव्हा नसण्यात जमा होते, तेव्हा मात्र त्या व्यक्तीची कमतरता, त्याची आठवण आपल्याला सतावून सोडते. थोडक्यात काय तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद ही भरभरून मिळणारी गोष्ट असूनसुद्धा तिच्या शोधात इतरत्र भटकत चालला आहे.

आपल्याभोवती दररोजच्या जीवनात तशा कितीतरी गोष्टी खूप चांगल्या घडत असतात. आपण आरोग्यसंपन्न जीवन जगत असतो. आपल्याला शरीराकडून कोणताही त्रास होत नसतो. पण याचे महत्त्व हे आपणास तेव्हाच समजू लागते, जेव्हा आपण कोणत्या तरी व्याधीने त्रस्त होतो अन् आपल्याला खाण्यापिण्यापासून प्रत्येक कृतीवर बंधनं लादली जातात.

आपण नॉर्मल आहोत, अ‍ॅब्नॉर्मल नाही. त्यासाठी कृतज्ञता बाळगायला हवी. एक सामान्य माणूस जो देहदिव्य आहे, त्याला प्रत्येक अवयव आहे. जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत, ज्यांनी सामान्य जीवन हे कधीच अनुभवलेले नाही. असे अनेक लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. कित्येकांच्या माथ्यावर छप्परदेखील नाही, अशाही महिला आहेत ज्या सुरक्षित जीवन जगू शकत नाही. कित्येकांना खूप सारे वैभव सुख असून झोपदेखील येत नाही. कधी कधी सामान्य आयुष्य जगणारे हे खूप भाग्यवान असतात. फक्त त्यांना आपल्या चांगल्या भाग्याची जाणीव होत नाही तर काहींना खूप उशीर होतो.

उगवतीचा सूर्य सुंदर आहे. तसाच मावळतीचाही सुरेख आहे. त्याच्या रंगाच्या विविध छटांनी आभाळात रंग भरतात आणि सारे आसमंत रंगात न्हाऊन जाते. संध्यासमयीच्या क्षितिजाच्या निळ्याशार रेषा किती कळत-नकळत अंधाराची चादर ओढून शांत निघून जातात. विस्तीर्ण रस्त्यावरील विजेच्या दिव्यांचेही सौंदर्य  काही कमी नसते. सृष्टीतील या नॉर्मल गोष्टीतसुद्धा केवढा आनंद लपलेला आहे. फक्त आपण तो उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतो. जेव्हा आपण आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीची कदर करतो तेव्हाच आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNatureनिसर्ग