शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कोका-कोला! - इतिहास घडवलेली ‘ख्रिसमस बॉटल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 06:05 IST

शीतपेयाबरोबरच त्याच्या बाटलीनंही इतिहास घडवला. हे शीतपेय होतं ‘कोका-कोला’! या बाटलीचं डिझाइन आजही वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. ही बाटली डिझाइन करतानाच्या शर्ती बघा. बाटलीचं डिझाइन अनोखं हवं, तिचं वजन आणि त्यातलं पेय ठराविकच असावं, अंधारात नुसत्या स्पर्शानंही बाटली ओळखता यायला हवी,  बाटली फुटली तर तिच्या तुकड्यांवरूनसुद्धा  ती कोका-कोलाची आहे हे लक्षात यायला हवं!

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- स्नेहल जोशी

‘कोका-कोला’ असं नुसतं नाव काढलं तर डोळ्यासमोर काय आलं? थंडगार काळं पेय, बुडबुडे आणि कंगोरे असलेली काचेची सुंदर बाटली. ती उघडताना येणारा सोड्याचा आवाज, बाटलीचा हाताला होणारा स्पर्श, बाटली हातात धरताना जाणवणारा काहीसा आत्मविश्वास, हे सगळं खूप उत्कट नसलं तरी प्रत्येकाला नक्की जाणवलेलं असणार. एकच वस्तू आपल्या पाचही इंद्रियांना सुख देऊन जाते हे खरोखर विलक्षण आहे. पण या कोक-बॉटलच्या डिझाइनचे अजून बरेच पैलू आहेत. 
डिझाइनच्या गोष्टी करताना आपण गेले काही दिवस औद्योगीकरणाबद्दल खूप काही बोललो. यंत्न-तंत्नाच्या साहाय्यानं आपण घाऊक उत्पादन करू लागलो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्पादकांची स्पर्धा होणं साहजिकच होतं. या स्पर्धेत आपला टिकाव कसा लागावा? या प्रश्नाला खूप कल्पक उत्तरं उद्योजक शोधू लागले.
कोका-कोलाची गोष्ट आजपासून 132 वर्षांपूर्वी सुरू होते. आपल्याकडे आजही जसे लिंबू सरबताचे ठेले असतात तसे अमेरिकेत सोड्याचे फाउण्टन असतात. अँटलांटाच्या डॉ. जॉन पेम्बरटन यांचं औषधांचं दुकान होतं. त्यांनी कोला नावानं हे सरबत पहिल्यांदा तयार करून आपल्याच दुकानाबाहेर लोकांना चव पाहायला दिलं. ते लोकांना इतकं आवडलं की त्यांनी ते ग्लासवारी विकायला सुरु वात केली. जॉन यांनी त्यांचे स्नेही फ्रँक रॉबिन्सन यांना भागीदार करून घेतलं. नुसतं कोला म्हणण्यापेक्षा ‘कोका-कोला’ या नावात लय आहे त्यामुळे नाव लोकांच्या लक्षात राहील असं म्हणून रॉबिन्सन यांनी या नावाचं सुलेखनसुद्धा स्वत:च केलं. कोका-कोलाचा लोगो आजही तोच आहे. अर्थात डॉ. जॉन यांना त्यांनीच तयार केलेल्या शीतपेयाच्या क्षमतेचा अंदाज नव्हता. त्यांनी आपला वाटा कँडलर नामक उद्योजकाला विकून टाकला. कँडलर दूरदर्शी होते. त्यांनी कोका-कोलाचे सर्व हक्क विकत घेतले.
फक्त 13 वर्षांच्या कालावधीत कोका-कोलाचे फाउंटनच अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये पसरले. या उद्योगाला पुढची दिशा दिली ती जोसेफ व्हाइट हेड आणि बेंजामिन थॉमस यांनी. कोका-कोला फाउंटनमधून बाहेर पडून लोकांच्या घरी पोहोचायला हवं असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यासाठी काचेच्या बाटल्यांमध्ये पॅकेजिंग करण्याचं ठरवलं. काच रासायनिकदृष्ट्या निष्क्रि य असते, त्यामुळे आतल्या पदार्थावर परिणाम करत नाही. या बाटल्या सरळसोट होत्या आणि काचेतच कोका-कोलाचा ट्रेडमार्कउमटवलेला असे. एव्हाना कोका-कोला प्रसिद्ध झाल्यामुळे प्रतिस्पर्धी निर्माण झाले होतेच. कोका-कोलाची नक्कलसुद्धा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली. पेयाबरोबर बाटलीच्याही प्रती बाजारात आल्या. कोका-कोलाचं वेगळेपण कसं जपावं असा मोठा प्रश्न पडला. उत्तर अर्थातच डिझाइनमध्ये होतं. डिझाइनच्या शर्ती पहा,  बाटलीचं डिझाइन अनोखं हवं. त्यात 6.5 अंस सरबत मावायला हवं. बाटलीचं वजन किमान 14.5 अंस असावं. अंधारात नुसत्या स्पर्शानी बाटली ओळखता हवी. बाटली फुटून पडली असली तर तिच्या तुकड्यांवरूनसुद्धा ती कोका-कोलाची आहे असं लक्षात यायला हवं.
इंडियानामधल्या रूट ग्लास कंपनीनं बाटली डिझाइन करण्यासाठी टीम नेमली. याविषयी संशोधन करताना एका विशिष्ट कोकोच्या बी चे चित्न त्यांच्यासमोर आलं. बी आकारानं लांबुळकी होती आणि तिच्यावर रेषा होत्या. बाटलीचा आकार या कोकोच्या बीमध्ये गवसला. 1916 मध्ये बाटलीचे बरेच नमुने करून बघितल्यावर उत्पादकांचं एकमत झालं. 1923 मध्ये अनोखा शिल्पकार असलेल्या या बाटलीच्या डिझाइनवर पेटंटही मिळालं. गंमत म्हणजे त्याकाळी फक्त मंगळवारी पेटंट देऊ करण्याची प्रथा होती. कोका-कोलाच्या बाटलीला पेटंट मिळालं ते 25 डिसेंबरच्या मंगळवारी; त्यामुळे तिला ‘ख्रिसमस बॉटल’ असंही म्हणतात. 
एवढा सगळा खटाटोप, एवढा खर्च काही केवळ वेगळेपणासाठी नव्हता. यातून पॅकेजिंग आणि वितरणाची प्रणाली उभी करायची होती. कोका-कोलाचा खप अमेरिकेपुरता सीमित राहिला नव्हता. इतर देशांतही तोच फॉम्र्युला वापरून पेय बनविण्याचे कारखाने उभारले गेले. सगळीकडे प्रमाणबद्धता हवी. बाटल्या वाहून नेण्यासाठी क्रेटदेखील डिझाइन करण्यात आले. एका व्यक्तीला 12 बाटल्यांचं वजन सहज उचलता येतं, यावरून क्रेटचा आकार ठरला. पूर्वी हे क्रेट लाकडी होते. बाटल्या वाहतुकीत डुचमळता कामा नयेत, या हिशेबानं आधार दिला गेला, आणि एकावर एक ठेवता यावेत म्हणून चौकोनी क्रेटची रचना करण्यात आली. भरलेल्या बाटल्यांचे क्रेट दुकानदाराला देऊन त्याच्याकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या परत कारखान्यात घेऊन येण्याचं कामही वितरकांचं आहे. बाटल्या काचेच्या असल्याने त्या निर्जंतुक करून पुन्हा वापरता येतात. यामुळे खूप मोठय़ा प्रमाणावर खर्च तर वाचतो, पण त्याहून अधिक पर्यावरण हानीही काही प्रमाणात टाळता येते. बाटल्या फुटल्या, तरी काच ही पूर्णत: रिसायकल करता येते.
कोका-कोलाची ही बाटली कितीतरी स्तरांवर र्शेष्ठ ठरते. तिचं मानव-केंद्रित डिझाइन पेय पिणार्‍याला आनंददायी आहेच, पण कारखानदारांना, वितरकांना, विक्रेत्यांना सगळ्यांनाच लाभदायी ठरलंय. अर्थात गेल्या काही वर्षांत प्लॅस्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे या पॅकेजिंगची मूळ कल्पना धूसर, गढूळ झाली. बदलत्या काळाची, गरजांची, कारखान्यांची, तंत्नाची दखल घेता हे बदल रास्त की नाही हे ठरवणं आत्तातरी अवघड आहे. पण सुमारे 100 वर्षांपूर्वी घडवलेल्या ‘ख्रिसमस बॉटल’मागचे डिझाइनचे विचार नक्कीच जपण्यासारखे आहेत.

snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)