ये बेहतर है..
By Admin | Updated: September 5, 2015 15:37 IST2015-09-05T15:37:41+5:302015-09-05T15:37:41+5:30
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं आज आपण पैशांत रूपांतर करतोय. जलविद्युत प्रकल्पांच्या नावाखाली नद्यांना मरणाच्या दारात ढकलतोय. आता यापुढची युद्धं पाण्यामुळेच होतील असं सारेच तज्ज्ञ सांगताहेत, त्यात तथ्यही आहे. पण हेच पाणी जगभरातला ‘ज्वालामुखी’ शांतही करू शकतं

ये बेहतर है..
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं आज आपण पैशांत रूपांतर करतोय. जलविद्युत प्रकल्पांच्या नावाखाली नद्यांना मरणाच्या दारात ढकलतोय. आता यापुढची युद्धं पाण्यामुळेच होतील असं सारेच तज्ज्ञ सांगताहेत, त्यात तथ्यही आहे. पण हेच पाणी जगभरातला ‘ज्वालामुखी’ शांतही करू शकतं, जगातल्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक देशाला आपुलकीच्या नात्यानं जोडू शकतं.
पाणी विषयातले ‘नोबेल’ समजल्या जाणा:या ‘स्टॉकहोम वॉटर’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले मॅगसेसे पुरस्कारप्राप्त ‘जलपुरुष’- डॉ. राजेंद्रसिंह यांच्याशी विशेष संवाद
रत की एक खास बात है.
भारत ने हमेशा नदी, पानी का सम्मान किया है.
लेकिन यह भी सच है, ये सब अब इतिहास हो चुका है.
नदीचा, पाण्याचा सन्मान हीच आपली संस्कृती होती, आहे. कारण याच नदीच्या काठी संस्कृतीचा उदय झाला आणि याच पाण्यानं माणसालाही सुसंस्कृत केलं.
वर्षानुर्वष, शतकानुशतकं हीच परंपरा कायम होती. त्याला पहिल्यांदा गालबोट लागलं, ते ब्रिटिशांच्या काळात.
ते शहर होतं बनारस.
तत्कालीन भारतातलं सर्वात मोठं सांस्कृतिक, धार्मिक शहर.
ब्रिटिश अधिकारी हॉकिंग्ज त्यावेळी बनारसचा कमिशनर होता. काळ होता 1932.
या हॉकिंग्जनं आपल्या अखत्यारीत पहिल्यांदा आदेश दिला, ‘बनारस को अगर सुंदर बनाना हो, तो यहॉँ की नालीयॉँ हटा दो. सब नालीओंका गंदा पानी नदी में मिला दो!.’
नद्यांच्या गटारगंगाकरणाची ती सुरुवात होती.
1932 मध्ये भारतात पहिल्यांदा नाल्यांचं घाण पाणी नदीत सोडलं गेलं आणि त्यानंतर एकामागोमाग एक देशात सारीकडे रीघच लागली.
आपलं शहर सुंदर बनवायचं असेल तर नाले असे उघडय़ावर वाहू देऊ नका! नदीच्या पाण्यात त्याचं विसर्जन करा!.
आजर्पयत शुद्ध असलेलं नद्यांचं पाणी अशुद्ध आणि गटारगंगा व्हायला मग फार वेळ लागला नाही.
आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.
पाणी हा सजीवाचा, सृष्टीचा ‘प्राण’ नसून तो (पैसा मिळवून देणारा) एक ‘उपयोगी घटक’, ‘उपभोग्य वस्तू’ आहे हे लोकांच्या मनावर ठसवलं गेलं.
त्याचेच परिणाम आज केवळ मनुष्यप्राणीच नाही, तर सारी सजीवसृष्टीच भोगते आहे.
फक्त भारतातच हे घडलं, असं नाही. सा:या जगात याचीच पुनरावृत्ती झाली. नदीवरचा, पाण्यावरचा समजाचा हक्क जाऊन सरकार, धनदांडग्यांनी त्यावर ताबा मिळवला आणि नदी-पाण्याच्या, त्याचबरोबर माणसाच्या साडेसातीला सुरुवात झाली.
कुठेच काहीच फरक नाही. पण लोकांना आता हळूहळू जाण आणि जाग येऊ लागली आहे. गतकाळात झालेल्या चुका निस्तारना जगभरातले लोक आता प्रामाणिकपणो प्रयत्न करताना दिसताहेत.
गेल्या दोन महिन्यांत मी सुमारे सात देशांत फिरलो, तर गेल्या काही वर्षात साठ ते सत्तर देशांना मी भेटी दिल्या.
ब:याच ठिकाणचं चित्र बदलतं आहे.
इस्त्रयल, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्वीत्ङरलड.
पूर्वी आपल्या हातून घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त घेऊन त्याचं परिमार्जन करताना ते दिसताहेत.
‘पाणी’ हा जगातला सर्वात मौल्यवान घटक आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. पाण्याचा गैरवापर आणि दुरुपयोग आपल्या विकासाचा रथ जमिनीत गाडू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष वाढतो आहे. पाणी वापरासंबंधीचे कायदे कडक झाले आहेत. पाणीचोर आणि पाण्याची नासाडी करणा:यांना कठोर शिक्षेनं दंडित केलं जातं आहे. सर्वच प्रकारच्या पाण्यावर प्रक्रिया करताना पाण्याच्या थेंबाचीही नासाडी होणार नाही आणि त्याचा पुनर्वापर होईल याबाबत काटेकोर नियोजन केलं जातंय.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचेही वेगवेगळे स्तर त्यांनी बनवलेत. समजा प्रक्रियायुक्त पाणी ‘क’ दर्जाचं आहे, ते पिण्यासाठी उपयुक्त नाही, मग ते शेतीसाठी वापरा. अर्थात त्या पाण्यातला कोणताही अनिष्ट घटक एक शतांशही येणा:या पिकांत उतरणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन!
समजा ‘ब’ दर्जाचं पाणी, तेही पिण्यासाठी उपयुक्त नाही, मग ते माणूस, प्राण्यांच्या इतर गरजांसाठी वापरा; पण त्यांच्या आरोग्यावर त्याचा काडीचाही विपरीत परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेऊन!
‘अ’ दर्जाचं पाणी. जे पिण्यासाठी उपयुक्त आहे, मग ते फक्त पिण्यासाठीच वापरा. या पाण्याचा उपयोग घरगुती वापरासाठी होणार नाही, शेतीसाठी होणार नाही, उद्योगांसाठी होणार नाही आणि या पाण्याच्या गैरवापरालाही क्षमा नाही!.
याउलट आम्ही काय केलं? काय करतोय?
केलेल्या पापाचं प्रायश्चित्त तर दूरच, पण या पापातले वाटेकरी दिवसेंदिवस वाढताहेत. नद्या अजून घाण होताहेत, पाण्याच्या नासाडीनं आकाश गाठलंय. मी दांडगट आहे, माङयाकडे सत्ता आहे, पैसा आहे, मग मी वाट्टेल तशी हडेलहप्पी करणार. ज्या पाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे, ते पाणीही फक्त ‘मी’, माङयासाठी, एकटाच वापरणार आणि लाटणार!
कुठलंच नियोजन केलं नाही. ना वर्तमानाचा विचार, ना भविष्याचा!
त्यामुळे खर्च वाढला, प्रदूषण वाढलं, नद्यांचे नाले झाले आणि अनेक नद्या तर थेट या भूतलावरून गायबच झाल्या!.
पाण्याचं लायसेन्सिंग करून आणि पाण्याला ‘किंमत’ आकारून प्रश्न कसा सुटणार? ज्यांच्याकडे पैसा आहे, ते पाणी विकत घेणार, पाणी त्यांनाच मिळणार, आपल्या हडेलहप्पीच्या जोरावर पाण्याची नासाडी ते करत राहणार आणि सर्वसामान्य, आधीच भुकेनं अर्धपोटी असलेली गरीब जनता तहानेनं व्याकूळ होऊन मरत राहणार!
‘पाण्यावर संपूर्ण समुदायाची मालकी’ हे तत्त्व आपण मान्य केलं तरच पाण्याच्या भेडसावणा:या समस्येतून आपली सुटका होऊ शकेल.
सध्या ठिकठिकाणी उभे राहणारे जलविद्युत प्रकल्पही आपल्याला देशोधडीला लावणारेच आहेत. जलविद्युत प्रकल्पांना माझा विरोध नाही, पण ऊर्जानिर्मितीच्या नावाखाली नद्यांना मरणाच्या दारात ढकललं जातंय. खरंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं दोन्हीही गोष्टी होऊ शकतात. नद्याही प्रवाही, जिवंत राहू शकतात आणि ऊर्जा निर्मितीही होऊ शकते. विकासाच्या या पर्यायी मार्गाचा विचार आणि वापर आपण करणार की नाही?
‘नदी, पाण्यावर समाजाची मालकी’ हा तर अतिशय सोपा, स्वस्त, शाश्वत आणि पारंपरिक मार्ग. पावसाचं पाणी अडवा, जिरवा, त्याचा उपयोग करा, जमिनीत पुनर्भरण करा. त्यानं ना कोरडा दुष्काळ पडेल, ना ओला, पण ते समजून मात्र घ्यायला हवं.
नद्या प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकतात, पण हव्यास नाही. त्या वाहत्याच राहायला हव्यात. त्यांच्या प्रवाही राहण्याचा आदर आपण केलाच पाहिजे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं आज आपण पैशांत रूपांतर करतोय. आता यापुढची युद्धं पाण्यामुळेच होतील असं सारेच तज्ज्ञ सांगताहेत, त्यात तथ्यही आहे. पण याच पाण्यामुळे जगभरात शांतताही नांदू शकते.
जगाला एकत्र आणण्याचं पाणी हे एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं, जगातल्या प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक देशाला आपुलकीच्या नात्यानं ते जोडू शकतं.
देश, विश्व, जीवन सुंदर, समृद्ध बनाना हो तो इससे बेहतर पर्याय और कौन सा हो सकता है?.
- शब्दांकन : समीर मराठे