शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज मागे घ्यायचा दिवस अन् भाजपकडून उबाठाच्या उमेदवाराला पळविण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 22:33 IST

Zp, Panchayat Samiti Election 2026: पनवेल पंचायत समितीसाठी ठाकरे गटाकडून अनिता डांगरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे समीकरण ठरल्यानंतर, आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवेळी त्यांचा अर्ज मागे घेणे अपेक्षित होते.

पनवेल: पनवेलपंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना भाजपने पैशांचे आमिष दाखवून कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकारामुळे पनवेलमध्ये काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पनवेल पंचायत समितीसाठी ठाकरे गटाकडून अनिता डांगरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे समीकरण ठरल्यानंतर, आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवेळी त्यांचा अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार हे पाऊल उचलले जाणार होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, "विरोधक असलेल्या भाजप नेत्यांनी एक कट रचला. अनिता डांगरकर यांनी आपला अर्ज मागे घेऊ नये आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हावी, यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्नही भाजप कार्यकर्त्यांनी केला."

अर्ज भरण्याच्या दिवशी गोंधळआज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी होती. त्याच वेळी हा 'नाट्यमय' प्रकार घडल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. महाविकास आघाडीने भाजपच्या या 'फोडाफोडी'च्या राजकारणाचा निषेध केला असून, लोकशाहीची पायमल्ली होत असल्याची टीका केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Panvel: BJP Allegedly Tried to Abduct Uddhav Thackeray's Candidate

Web Summary : High drama in Panvel as BJP allegedly tried to abduct a Shiv Sena (UBT) candidate, Anita Dangarhar, offering her money to withdraw her nomination. Mahavikas Aghadi leaders accused BJP of sabotage and undermining democracy during Panchayat Samiti elections.
टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६panchayat samitiपंचायत समितीpanvelपनवेल