अर्ज मागे घ्यायचा दिवस अन् भाजपकडून उबाठाच्या उमेदवाराला पळविण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 22:33 IST2026-01-27T22:32:55+5:302026-01-27T22:33:51+5:30

Zp, Panchayat Samiti Election 2026: पनवेल पंचायत समितीसाठी ठाकरे गटाकडून अनिता डांगरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे समीकरण ठरल्यानंतर, आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवेळी त्यांचा अर्ज मागे घेणे अपेक्षित होते.

Zp, Panchayat Samiti Election 2026: Day to withdraw application and BJP tries to run away Shiv sena UBT candidate; High voltage drama in Panvel | अर्ज मागे घ्यायचा दिवस अन् भाजपकडून उबाठाच्या उमेदवाराला पळविण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा 

अर्ज मागे घ्यायचा दिवस अन् भाजपकडून उबाठाच्या उमेदवाराला पळविण्याचा प्रयत्न; पनवेलमध्ये हायव्होल्टेज ड्रामा 

पनवेल: पनवेलपंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना भाजपने पैशांचे आमिष दाखवून कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकारामुळे पनवेलमध्ये काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पनवेल पंचायत समितीसाठी ठाकरे गटाकडून अनिता डांगरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे समीकरण ठरल्यानंतर, आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवेळी त्यांचा अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार हे पाऊल उचलले जाणार होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, "विरोधक असलेल्या भाजप नेत्यांनी एक कट रचला. अनिता डांगरकर यांनी आपला अर्ज मागे घेऊ नये आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हावी, यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्नही भाजप कार्यकर्त्यांनी केला."

अर्ज भरण्याच्या दिवशी गोंधळ
आज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी होती. त्याच वेळी हा 'नाट्यमय' प्रकार घडल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. महाविकास आघाडीने भाजपच्या या 'फोडाफोडी'च्या राजकारणाचा निषेध केला असून, लोकशाहीची पायमल्ली होत असल्याची टीका केली आहे.

Web Title : पनवेल: भाजपा पर उद्धव ठाकरे के उम्मीदवार को अगवा करने का आरोप

Web Summary : पनवेल में हंगामा: भाजपा पर शिवसेना (यूबीटी) उम्मीदवार अनिता डांगरकर को अगवा करने और नामांकन वापस लेने के लिए पैसे की पेशकश का आरोप। महाविकास अघाड़ी ने भाजपा पर पंचायत समिति चुनाव में लोकतंत्र को कमजोर करने का आरोप लगाया।

Web Title : Panvel: BJP Allegedly Tried to Abduct Uddhav Thackeray's Candidate

Web Summary : High drama in Panvel as BJP allegedly tried to abduct a Shiv Sena (UBT) candidate, Anita Dangarhar, offering her money to withdraw her nomination. Mahavikas Aghadi leaders accused BJP of sabotage and undermining democracy during Panchayat Samiti elections.