शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता मिळणार चार पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 02:37 IST

जिल्हांतर्गत बदलीचेही धोरण जाहीर; बदल्या ऑनलाइनच होणार

मुंबई : जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा पर्याय देता येणार आहे. ग्रामविकास विभागाने बुधवारी आंतरजिल्हा बदल्यांचे तसेच जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे धोरण जाहीर केले. सर्व बदल्या ऑनलाइनच होणार आहेत.

याआधी आंतरजिल्हा बदली एकच पर्याय देता येत होता. आता चार जिल्ह्यांचे पर्याय देता येतील. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या पती-पत्नीस आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करायचा असेल तर दोघांपैकी एका जिल्ह्याचा पर्याय निवडता येईल. दोघे वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत आणि त्यांना तिसऱ्याच जिल्ह्यात बदली हवी असेल तर दोघांपैकी जो कनिष्ठ असेल त्याची सेवाज्येष्ठता गृहीत धरण्यात येणार आहे.

आंतरजिल्हा बदलीसाठी सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) लागेल, ही पूर्वीची अट कायम ठेवण्यात आली आहे. एनओसी असलेल्यांना बदल्यांबाबत प्राधान्य असेल. त्यानंतर संवर्ग एकमधील कर्मचाऱ्यांना प्राधान्य राहील. ज्या प्रवर्गातून कर्मचाऱ्याची निवड झाली आहे त्याच प्रवर्गातील रिक्त पदावर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाईल. पती-पत्नी एकत्रिकरणाबाबतचा प्राधान्यक्रमही या धोरणात निश्चित करण्यात आला आहे. दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर बदलीत प्रथम प्राधान्य असेल. यापूर्वी शिक्षकांना स्वत:च बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत असे. आता त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि ते अर्ज ऑनलाइन टाकतील.

जिल्हांतर्गत बदल्यांबाबत अवघड क्षेत्र कोणते यासाठीचे सात निकष ठरविण्यात आले असून, त्यातील तीनची पूर्तता करणारे क्षेत्र हे अवघड मानले जाईल. दरवर्षी ३१ मेपर्यंतच बदल्या करण्यात येतील. जिल्हांतर्गत बदल्यांसाठीही संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षक सहकार संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी या धोरणांचे स्वागत केले आहे.

जिल्हांतर्गत बदलीसाठी...
जिल्हांतर्गत बदलीसाठी यापूर्वी २० शाळांचा पर्याय देता येत होता. आता ३० शाळांचा पर्याय देता येईल. ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल ते बदलीपात्र असतील. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एका शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीपात्र मानले जातील.