शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बायको, मुलगा, भाचा, पुतण्या...जिल्हा परिषदेतही घराणेशाहीच! राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा 'व्हाईट कॉलर'लाच पसंती

By संतोष कनमुसे | Updated: February 9, 2026 16:06 IST

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहे. राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, या निवडणुकीत अनेक ठिकाणी घराणेशाही पाहायला मिळाली. नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते.

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे 'घराणेशाही'ची चर्चा रंगली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी रिंगणात उडी घेतली होती, यामध्ये काहींनी बाजी मारली, तर काहींना मतदारांनी नाकारले.

Sharad Pawar Health: मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार

सांगलीत प्रस्थापितांच्या वारसांची कामगिरी

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात भाजपा आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक यांनी निवडणूक लढवली. तर, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या स्नुषा राजेश्वरी रणधीर नाईक (वाकुर्डे बुद्रुक गट) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी खोत यांनी विजय मिळवला आहे.

कुंडलमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा धनश्री लाड यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर यांनीही नशीब आजमावले. त्यांचाही विजय झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही घराणेशाही

भाजपाचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांचा विजय झाला. तसेच राधानगरी-पिंपळगाव मतदारसंघातून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भावजय रोहिणी अर्जुन आबिटकर विजयी झाल्या.

रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचाही विजय झाला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनीही निवडणूक लढवली होती, त्यांचा मोठा विजय झाला आहे. 

माळशिरसमध्ये मोठी उलटफेर पाहायला मिळाला. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला.

सातारा जिल्हा परिषदेतही घराणेशाही पाहायला मिळाली. कुक्कुडवाड गटामध्ये अनिल राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनिल देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलतबंधू अरूण गोरे यांचा पराभव केला तर मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादी (अजित पवार)  यांनी मंत्री गोरे यांच्या भावजय भारतीताई अंकुश गोरे यांचा पराभव केला.

मराठवाड्यातही नेत्यांच्या नातेवाईकांची सरशी

मराठवाड्यातही नेत्यांच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली होती. खासदार भूमरेंचा पुतण्या  शिवराज भूमरे - पाचोड, आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमेर सत्तार - अंभई , आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतण्या निखिल चव्हाण - गणोरी यांचाही मोठा विजय झाला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील जवळा जिल्हा परिषद गटात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) लढत आपल्या काकांच्या सत्तेला मोठे खिंडार पाडले आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली होती.  यावेळीही अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत नातेवाईकांनाच नेत्यांनी तिकिट दिल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये काही ठिकाणी पराभवही झाल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dynasty politics dominate Zilla Parishad elections; white collar preference prevails.

Web Summary : Zilla Parishad elections reveal widespread nepotism. Leaders favored relatives, securing victories for family members in Sangli, Kolhapur, Raigad, Solapur and Marathwada. Despite some defeats, dynasty politics remain prominent.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक 2026