शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

चीनमधील कोरोनाग्रस्त भागात मीरा रोडची तरुणी, तरुण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 6:02 AM

संडे अँकर । व्हिडीओद्वारे पालकांशी संपर्क : केंद्राने सुटकेसाठी प्रयत्न करावेत

मीरा रोड : जपानजवळ असलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर मीरा रोडची सोनाली ठक्क र, तर आकाश पाठक हा चीनमध्ये वयहान शहराजवळ कोरोनामुळे अडकून पडले आहेत. दोघांना कोरोनाची लागण झालेली नसली तरी लागण होण्याच्या भीतीने सरकारने तातडीने येथून सुटका करून मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांनी व्हिडीओद्वारे केली आहे.

मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्क भागातील मेरी गोल्ड - ३ मध्ये राहणारी सोनाली (२४) ही जपानजवळच्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर अडकली आहे. ती जहाजावर सुरक्षा अधिकारी म्हणून काम करते. डिसेंबरपासून ती जहाजावर आहे. सोनालीने व्हिडीओद्वारे मदतीचे आवाहन सरकारला केले आहे. सुरुवातीला जहाजावर १० जणांना लागण झाली होती, ती संख्या आता २८९ इतकी झाली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जहाजावरच ठेवले गेले तर आम्हालाही कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बुधवारी तपासणी झाली असून त्याच्या अहवालाची वाट बघत आहे. डॉक्टर व तपासणी यंत्रणांची संख्या कमी असल्याने दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.चार दिवसांपासून मला एका केबिनमध्ये एकाकी ठेवले आहे. माझे पालक काळजीत आहेत. पण, नक्कीच आम्हाला मदत मिळेल, अशी आशा तिने व्यक्त केली आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी तिचा व्हिडीओ टिष्ट्वटरवर शेअर करून मदतीचे आवाहन केले आहे.तिचे वडील दिनेश ठक्कर यांनी सांगितले की, आम्ही सर्व खूपच चिंतेत आहोत. सोनालीशी आम्ही रोज व्हिडीओ कॉलवरून बोलतो.जर केंद्र सरकार वुहानमध्ये अडकलेल्यांना सुरक्षित आणू शकते तर मग दूर जपानला जहाजावर अडकलेल्या भारतीयांची मदत का करत नाही?आकाश चीनमधील एका विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो. कोरोनामुळे आकाश सात दिवस एका खोलीत राहत असून दिवसेंदिवस येथील परिस्थिती बिकट होत असून मायदेशी परतण्याची विनंती केली आहे.मदतीसाठी आवाहन केलेमीरा रोडचा आकाश हा चीनमधील वुहान प्रांताजवळच्या हेनान प्रोर्विस शहरात अडकला आहे. आकाशनेही व्हिडीओमार्फत तेथील परिस्थिती दाखवत मदतीसाठी आवाहन केलेआहे. 

टॅग्स :chinaचीनMumbaiमुंबईcorona virusकोरोना