शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांनी केला गुंडाचा खून

By admin | Updated: November 2, 2015 03:09 IST

दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला. शनिवारी मध्यरात्री गिट्टीखदान परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली.

नागपूर : दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला. शनिवारी मध्यरात्री गिट्टीखदान परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गुणवंत सोनेकर (२३) रा. अजनी असे मृत तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला अजनी पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते.तडीपार झाल्यापासून रोहित गिट्टीखदान चौकातील पंचशीलनगर येथे राहात होता. वस्तीतील १७ वर्षीय आरोपीशी आणि त्याच्या मित्राशी त्याची ओळख झाली. रोहित स्वत:चा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचा. दारू व सिगारेटसाठी पैसे मागायचा. काही दिवस दोघांनी रोहितचे ऐकले. रोहित त्यांना मारहाणसुद्धा करू लागला. या त्रासाला दोघेही कंटाळले होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजता रोहितने दोघांनाही मारहाण केली, तेव्हा रोहितला संपविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रात्री १ वाजता त्या दोघांचा रोहितसोबत पुन्हा वाद झाला. झेंडा चौकात दोघांनीही शस्त्रांनी वार करून रोहितचा खून केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. यातील एक अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी आहे. त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेत पोलिसांचा निष्काळजीपणासुद्धा उघडकीस आला आहे. रोहित अजनीतून तडीपार होऊन मागील सहा महिन्यांपासून गिट्टीखदान येथील पंचशीलनगरात राहत होता. गिट्टीखदान पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पंचशीलनगर आहे. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये डीबी चमू असते. बाहेरचा गुन्हेगार वस्तीत येऊन भाड्याने राहत असूनही पोलिसांना माहिती मिळत नाही, हे आश्चर्यजनक आहे.