तरुणीने जाळून घेतले

By Admin | Updated: January 26, 2017 04:48 IST2017-01-26T04:48:17+5:302017-01-26T04:48:17+5:30

शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्याचे आमिष दाखवून जुनोना येथील सरपंचाने गावातीलच एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा मंगळवारी प्रयत्न केला.

The young woman burnt it | तरुणीने जाळून घेतले

तरुणीने जाळून घेतले

बोदवड (जळगाव) : शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्याचे आमिष दाखवून जुनोना येथील सरपंचाने गावातीलच एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा मंगळवारी प्रयत्न केला. त्यानंतर बदनामीच्या भितीने पीडित मुलीने संध्याकाळी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यात घडली.
विशेष म्हणजे घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंब घाबरले असून त्यांनी पोलिसांत अद्याप तक्रार केलेली नाही. पोलिसांनी केवळ या प्रकरणी अकस्मात मृृत्यूची नोंद केली आहे. या प्रकारानंतर सरपंच फरार झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The young woman burnt it