शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

'कधीही कुस्तीचा लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली, मग...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 8:57 AM

गदा ही पैलवानांच्या खांद्यावर शोभून दिसते. दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर शोभून दिसत नाही.

ठळक मुद्देआजपर्यंत पवार कुटुंब फक्त राजकीय मैदान गाजवतात असा माझा समजमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर अजित पवारांच्या हस्ते सत्कार पवार इथंही कमी नाही हे पुणेकरांनी लक्षातं घ्यावं

पुणे - पैलवानाला गदा दिली जाते, पण आज पहिल्यांदाच कधीही कुस्तीचा लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला नेहमी दिली जाते पण तुम्ही दिलेली गदा मलाही कळालं नाही कुठं ठेवावी, कशी धरावी अशाप्रकारे अजितदादांनी पुण्यातील एका कार्यक्रमात भाष्य केल्याने जनमाणसात हशा पिकला.  

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कात्रजच्या आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधिक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित आयोजकांनी अजित पवारांचा सन्मान करताना त्यांच्या हातात गदा दिली त्यावेळी ते बोलत होते. 

याबाबत बोलताना अजितदादा म्हणाले की, गदा ही पैलवानांच्या खांद्यावर शोभून दिसते. दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर शोभून दिसत नाही. राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय काय करता येईल यासाठी क्रिडामंत्र्यांसोबत बैठक घेतली. मुलगा अभ्यासात कमकुवत असला तरी खेळात उत्कृष्ट हवा असं पालकांना वाटलं पाहिजे. एखाद्या खेळात यश संपादन केल्यानंतर त्याला चांगली नोकरी लावता येईल यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्नशील असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

त्याचसोबत आजपर्यंत पवार कुटुंब फक्त राजकीय मैदान गाजवतात असा माझा समज होता पण पवार कुटुंब कुस्तीचं मैदानही गाजवतात हे आज कळालं. त्यामुळे पवार इथंही कमी नाही हे पुणेकरांनी लक्षातं घ्यावं असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. तसेच आज पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे, सत्कार समारंभामुळे गर्दी झाली. पण नागरिक बोलणार कोणाला पैलवानांचा कार्यक्रम आहे असा चिमटा अजित पवारांनी काढला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWrestlingकुस्ती