शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयातही आता योगाचे प्रात्यक्षिक

By admin | Updated: June 19, 2015 02:27 IST

योग दिनाचे आयोजन होणार सर्व कार्यालयात

अकोला- संपूर्ण जगभर २१ जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये या दिवशी योग प्रात्यक्षिक आयोजित केले जाईल. त्याचप्रमाणे आता सर्व शासकीय कार्यालयांमध्येही योग प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना बुधवारी दिला. योगाला ५ हजार वर्षांची परंपरा आहे. आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने येत्या रविवारी, २१ जून रोजी जगभर योग दिन साजरा होत आहे. भारतातही योग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. योगाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टिकोणातून आयोजित या दिनाचे महत्त्व आबालवृद्धांना व्हावे म्हणून शाळांसोबतच शासकीय कार्यालयातही योग दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

*प्रशिक्षणाचे आयोजन

        योग दिनाच्या निमित्ताने योग प्रात्यक्षिक सर्व शासकीय कार्यालयात आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्या निमित्ताने कर्मचार्‍यांना योगाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. योग प्रशिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडे उपलब्ध असून, त्यांच्या मार्गदर्शनात योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

*राज्यपाल मुंबई, तर मुख्यमंत्री नागपूरला करतील योगा

        राज्यपाल सी. विद्यासागर राव हे २0 आणि २१ जून रोजी मुंबई येथे राज्यपाल भवनात सकाळी योग दिन साजरा करणार आहेत. मुख्यमंत्री २१ जून रोजी नागपूर येथे आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. योग दिनाच्या आयोजनाची जबाबदारी आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांकडे राज्यात २१ जून रोजी सर्व शाळा आणि शासकीय कार्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी विभागीय पातळीवर विभागीय आयुक्तांकडे तर जिल्हापातळीवर जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे.