"हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार"; विरोधकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 05:57 PM2024-07-10T17:57:55+5:302024-07-10T18:03:59+5:30

Worli Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबीयांची महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सांत्वन

Worli Mumbai Hit and Run Case Congress MLA Aslam Shaikh slam CM Eknath Shinde Maharashtra Govt over common man | "हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार"; विरोधकांचे टीकास्त्र

"हे सर्वसामान्यांचं नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार"; विरोधकांचे टीकास्त्र

Worli Mumbai Hit and Run Case: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात महागड्या पोर्शे कारमधील अल्पवयीन मद्यधुंद चालकाने दोघांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी येथे एका बीएमडब्ल्यू कारमधील मद्यधुंद मिहिर शाह नामक चालकाने एका कोळी दाम्पत्याला धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय आणखी काही हिट अँड रनच्या केसेस महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात घडल्याचे दिसून आले. यावर आज सभागृहात चर्चा झाली. यावरून आज काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी सरकारवर टीका केली.

"हे सर्वसान्यांचं नव्हे तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे. नाखवा कुटुंबीयांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत सरकारला मोजावीच लागेल. हा अपघात नाही, ही हत्या आहे," असा खरपूस शब्दांत शेख यांनी सरकारवर टीका केली. वरळी हिट अँड रन घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची आमदार अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधली.

"एका सेलिब्रेटीला धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस प्रशासन लगेच त्या सेलिब्रेटिच्या घराबाहेर फौजफाटा तैनात करते, राज्यसरकार देखील प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता दाखवते. मात्र एका सामान्य महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीला अटक होण्यासाठी ६० तास लागतात. संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही बसवलेले आहेत. तरीदेखील आरोपीला पकडण्यासाठी ६० तास लागतात, हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहेच, मात्र सरकारी आशीर्वादाशिवाय ६० तास आरोपी मोकाट फिरणे शक्यच नाही. एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये वाटत आहे, मात्र नाखवा कुटुंबीयांना अजूनही सरकार मदत जाहीर करत नाही यावरुन सरकार संवेदनशील नाही हे स्पष्ट होते," असा आरोप अस्लम शेख यांनी केला. मृत महिलेच्या कुटुबीयांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

Web Title: Worli Mumbai Hit and Run Case Congress MLA Aslam Shaikh slam CM Eknath Shinde Maharashtra Govt over common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.