शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक ताण-तणाव दिन विशेष : मनाचा त्रिकोण सांभाळा, मनोविकारापासून दूर राहा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:34 IST

विचार, भावना आणि वर्तन ताणले गेले की तणाव निर्माण होतो.

ठळक मुद्दे मानसोपचार तज्ज्ञाचे आवाहन 

अतुल चिंचली       पुणे : मन म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. शास्त्रीय दृष्टीने मनाच्या अनेक व्याख्या होतात. मेंदू विज्ञान मनाचा विचार वेगळ्या पद्धतीने करतात. पहिल्या पातळीत विचार, भावना आणि वर्तन यांचा समभुज त्रिकोण असतो. तिघांमध्ये संवाद असेल तर समतोल राखला जातो. हे एकमेकांशी भांडत नाहीत त्याला मानसिक आरोग्य म्हणतात. आपल्या आयुष्यात सतत ओढाताण चालू असते. विचार आणि  भावना वेगवेगळ्या दिशेने जात असतात. त्या दोघांच्या जाळ्यात वर्तन अडकते. विचार, भावना आणि वर्तन ताणले गेले की तणाव निर्माण होतो. त्रिकोण फाटला की मानवाला मनोविकार होतात. त्यामुळे हा त्रिकोण सांभाळा असे आवाहन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांनी केले.          मानसिक आरोग्याची पहिली पातळी म्हणजे या तिघांमध्ये सुसंवाद हवा. या त्रिकोणात शरीर सहभागी झाले की त्याचे पिरॅमिड तयार होते. पुढच्या पातळीत शरीर आणि मनाच्या सुसंवादाला आरोग्य असे म्हणतो. आपले आवडते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शारीरिक कष्ट घेतो. ते उद्दिष्ट पूर्ण होते. पण आपल्याला थकल्यासारखे वाटत नाही. पण कामाचा आनंद मिळतो. येथे तणाव घेत नाही.मनाला समाधान मिळते. कामाची इच्छा नसताना काम केले, की शरीर मात्र कष्ट करते पण मन समाधानी होत नाही. हे काम आपण तणाव घेऊन केलेले असते.  त्यासाठी शरीर आणि मनाचा सुसंवाद महत्वाचा असतो. तिसऱ्या पातळीत पिरॅमिड स्थितीशील असल्याने त्याचे रूपांतर गतिशील अवस्थेत करण्यासाठी त्रिकोणाचे रूपांतर गणिती कोनात होते. विचार, भावना वर्तन यांना शरीराची ऊर्जा मिळाली की एक वर्तुळ तयार होते. या वतुर्ळात मनाची ऊर्जा तयार होते. 

१. विचार, भावना वर्तन यांचा सुसंवाद, २. मन शरीर यांचा सुसंवाद, ३. मनाची ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा यांचा सुसंवाद या तीन पातळया आहेत. 

विचार, भावना आणि वर्तन यांचा विस्तार कसा होतो.आपले विचार आत्मकेंद्रित न राहता समूह केंद्रित झाले की विचारांचा विस्तार होतो. आपल्या भावना समजून दुसऱ्यांच्या भावना समजण्याचा प्रयन्त केला की भावनांचा विस्तार होतो.  जसे कौशल्य वाढते तसे वर्तन विस्तारत जाते. कौशल्यामुळे वर्तनात, ज्ञानामुळे विचारात, अनुभवामुळे भावनामध्ये विस्तार होत जाणे. यालाच शिक्षण असे म्हणतात. ही प्रगतभावना आहेत. विचार, भावना आणि वर्तन सुसंवादाचा यांचा विस्तार झाला की आपल्या तणाव कमी होतो. या मानसशास्त्रमध्ये संतत्व येते. आपली आवड आणि दुसऱ्यांची आवड एकरूप झाली. या क्षणाला संतत्व असे म्हणतात.संतत्वाचा प्रत्येक क्षण मानवी जीवनाचा एक भाग असतो. या क्षणात आपला मी पणा विरघळतो. त्याचे दुसरे सूत्र म्हणजे स्वीकार असते. विचाराने ज्ञानमार्ग, भावनेने भक्तिमार्ग, आणि वर्तनाने कर्ममार्ग असे मार्ग संतत्वमध्ये येतात. विचार, भावना आणि वर्तन या तिघांमध्ये ऐक्य निर्माण झाले की संतत्व येते.      विचार आणि भावना यांची उत्क्रांती कशी झाली. आदिमानवाच्या काळात त्याच्यावर वन्य प्राणी हल्ला, त्सुनामी, वणवा, पूर, अशा नैसर्गिक आपत्ती येत असे. अशा वेळी त्याला तात्काळ निर्णय घेणे गरजेचे होते. आदिमानवाकडे लढा, पळा, लपून रहा असे तीन पर्याय होते. तो या पयार्यांचा वापर करू लागला. तेव्हाच स्वायत्त मज्जासंस्थेची स्थापना झाली. लढण्याबरोबर संताप, पळण्याबरोबर भीती, लपून राहण्याबरोबर नैराश्य आणि एकटेपणा या भावनांची निर्मिती झाली. यांना आपण आदिमभावना म्हणतो. सर्व काही निर्णय चुकले की जी भावना तयार होते. तिला खंत असे म्हणतात. आदिमानवाच्या काळापासून आदिमभावना मानवामध्ये रुजू झाल्या आहेत. आदिमभावनामध्ये स्वत:चा विचार केला जातो. प्रगतभावनामध्ये दुसऱ्याचा विचार केला जातो. सध्याच्या परिस्थितीत आपली बौद्धिक, तांत्रिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्व आव्हाने वाढत आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदिमभावनेबरोबरच प्रगतभावनेचा विचार केला पाहिजे. समोरच्या आव्हानांचा विचार करून डोकं चालवले तर संताप कमी होईल. संताप कमी झाला की माणूस तणावापासून दूर राहतो.                                                                                              

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधनाHealthआरोग्य