तरुणसागर महाराजांच्या ‘कडवे प्रवचन’ पुस्तकाचा जागतिक विक्रम

By Admin | Updated: August 21, 2014 01:35 IST2014-08-21T01:35:10+5:302014-08-21T01:35:10+5:30

27 हजार प्रवचन पुस्तकांपासून तयार केलेल्या पिरॅमिडने जागतिक विक्रम मोडला असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये त्याची नोंद झाली आहे.

The world record of 'Kadve Sermon' written by youngsagar maharaj | तरुणसागर महाराजांच्या ‘कडवे प्रवचन’ पुस्तकाचा जागतिक विक्रम

तरुणसागर महाराजांच्या ‘कडवे प्रवचन’ पुस्तकाचा जागतिक विक्रम

नाशिक : राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या प्रवचनाचे  जगातील सर्वात मोठे पुस्तक (32 फूट उंच व 2क् फूट रुंद) व 27 हजार प्रवचन पुस्तकांपासून तयार केलेल्या पिरॅमिडने जागतिक विक्रम मोडला असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये त्याची नोंद झाली आहे.
प्रवचन पुस्तकाचे 14 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. नवी दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री थावरचंद गेहेलोत यांच्या हस्ते पुस्तकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. 
तरुणसागर महाराज म्हणाले की, ही पुस्तके म्हणजे थापट नाही तर थप्पड आहे. पाल्याला झोपवण्यासाठी आई थापटत असते तर  चुकीच्या मार्गावर जाणा:या पाल्याला जागे करण्याचे काम अर्थात थप्पड देण्याचे काम पिता करत असतो. ही प्रवचने थप्पड देण्याची भूमिका बजावणारी आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी जॅक ब्रॅकबँक या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये झाल्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)
 
असे तयार झाले पुस्तक
च्नाशिकचे पारस लोहाडे यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यांनी सलग 15 दिवस काम केले. पुस्तकाचे वजन तीन हजार 8क्क् किलो इतके आहे.

 

Web Title: The world record of 'Kadve Sermon' written by youngsagar maharaj