एका हाताने टाळी वाजविण्याचा विश्‍वविक्रम

By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:36:06+5:302014-06-29T00:49:05+5:30

एका हाताने एका तासात सात हजार वेळा टाळी वाजवून अकोल्याच्या अमोल अनासने याने विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे.

World record of clapping with one hand | एका हाताने टाळी वाजविण्याचा विश्‍वविक्रम

एका हाताने टाळी वाजविण्याचा विश्‍वविक्रम

अकोला: एका हाताने एका तासात सात हजार वेळा टाळी वाजवून अकोल्याच्या अमोल अनासने याने विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे. या अद्भुत विजयाची दखल वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डने घेतली आहे. जुन्या शहरातील रहिवासी असलेला अमोल अनासने हा दहावीत असताना त्याला एका हाताने टाळी वाजविण्याचा छंद जडला. अमोल हाताच्या बोटांना रबरासारखे तळ हातावर आपटून त्यामधून टाळी वाजवितो. सराव व परिश्रमाने ही कला त्याला अवगत झाली. तो उजव्या व डाव्या हाताने टाळी वाजविण्याची प्रक्रिया करू लागला. इतरांना न जमणारी अशक्यप्राय बाब ही अंतत: विक्रम ठरली. अमोलने एका हाताने टाळी वाजविण्याची कला इडिया वर्ल्ड रेकॉर्डच्या निदर्शनास आणली. त्याने टाळी वाजविण्याचा व्हिडिओ इंडिया वर्ल्ड रेकॉर्डला पाठविला. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डने त्याला जगातील एका हाताने टाळी वाजविणारा विक्रमवीर घोषित केले. एका तासात दहा वेळा टाळी वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी आता अमोल प्रयत्न करणार आहे. टाळी वाजविण्यासोबतच अमोल डोनाल्ड डक या काटरून पात्रासारखा आवाज काढून मिमिक्रीचा सरावही करीत असल्याचे अमोलने २८ जून रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नगरसेविका मंजूषा शेळके, प्रा. डॉ. महेश डाबरे, अमोलचे वडील कैलास अनासने उपस्थित होते.

Web Title: World record of clapping with one hand