शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक संगीत दिन विशेष : संगीताशी नाळ जुळलेले पडद्यामागचे कलाकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:42 IST

संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर...

ठळक मुद्देगायन, वादन खऱ्या अर्थाने खुलवणारे वाद्य कारागीरही संगीत क्षेत्राचा महत्वाचा स्तंभसंगीत कधीच लोप पावणार नाही. कारण, ते अमर, अभिजाततबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, जेंबे अशा वाद्यांना आजही पूर्वीइतकीच मागणीइलेक्ट्रॉनिक वाद्यांमुळे पारंपरिक वाद्यांचे महत्व कमी झालेले नाही

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : सूर, ताल, लय यांचा अनोखा मिलाफ असणारे अभिजात संगीत प्रत्येकालाच भुरळ घालते. या कलेशी थेट नाळ जुळणे म्हणजे अहोभाग्यच! मात्र, संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर. वाद्य कारागिरी ही संगीतसाधनाच असते, या कलेचेही संगोपन व्हावे, अशा भावना या पडद्यामागच्या कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. काळ कितीही बदलला तरी संगीत अभिजातच आहे, जागतिक स्तरावर संगीताचे महत्व वादातीत आहे, असा सूरही या कलाकारांनी आळवला.२१ जून अर्थात जागतिक संगीत दिवस. संगीत लोकाभिमुख व्हावे, यासाठी गायक, वादक प्रयत्नशील असतातच. परंतु, गायन, वादन खऱ्या अर्थाने खुलवणारे वाद्य कारागीरही संगीत क्षेत्राचा महत्वाचा स्तंभ आहे. तंबोरा सुरात लागला नाही तर गाणे फुलत नाही. सूर-तालाचे समीकरण जमवायचे असेल तर संगीताशी संबंधित प्रत्येक घटकाने संगीताचा बारकाईने अभ्यास करावा, असे वाद्य कारागीरांनी सांगितले. पुरुषोत्तम जोग म्हणाले, ‘मी २००० सालापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. व्हायोलिन, तबला, तानपुरा, गिटार, मेंडोलिन अशी अनेक वाद्ये आपल्याकडे दुरुस्तीसाठी येतात. वाद्यांचे ट्युनिंग हा आनंददायी प्रकार असतो. वाद्य कारागीर हे पडद्यामागचे कलाकार असतात. मात्र, तरीही संगीत क्षेत्राचा एक अविभाज्य घटक असल्याचे समाधान वाटते. इलेक्ट्रॉनिक वाद्ये केवळ सोय म्हणून ठीक आहेत. मात्र, पारंपरिक वाद्यांचे सौैंदर्य काही वेगळेच असते. संगीताकडे नवीन पिढीचा ओढा वाढत आहे. संगीत कधीच लोप पावणार नाही. कारण, ते अमर, अभिजात आहे.’विजय नाईक म्हणाले, ‘तबला, पखवाज, ढोलक, ढोलकी, जेंबे अशा वाद्यांना आजही पूर्वीइतकीच मागणी आहे. वाद्य कारागिरीला अद्याप हक्काचे व्यासपीठ मिळालेले नाही. मात्र, ही कला संगीताशी असलेले नाते अधिकाधिक दृढ करत राहते. इलेक्ट्रॉनिक वाद्यांमुळे पारंपरिक वाद्यांचे महत्व कमी झालेले नाही.’-----------खाजाभाई शेख हे गेली ५५-६० वर्षे विविध प्रकारची चर्मवाद्ये बनविणे, त्यांची दुरूस्ती करण्याचे कार्य करतात. उस्ताद अहमदजान थिरकवॉ खॉसाहेब, उस्ताद अल्लारखॉसाहेब, पं. बिरजू महाराज यांनी त्यांच्या कारिगिरीचे कौतुक केले होते. कथक नृत्यगुरू प्रभा मराठे, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे सहकारी श्री. विष्णू घाग व श्री. ज. स. मराठे, सुधाकर मराठे असे शास्त्रीय संगीतातील कलावंत तर लावणीसम्राज्ञी रोशन सातारकर, सुरेखा पुणेकर, अमर पुणेकर, विविध प्रांतातील कव्वाल मंडळी तसेच घाशीराम कोतवाल, गाढवाचं लग्न अशा नाटकांमधील साथीदारांच्या वाद्यांची दुरुस्ती खाजाभार्इंनी केली आहे. त्यांचे चिरंजीव सलीमभाईही निष्णात वाद्यकारागिर आहेत. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतartकला