अहो, वाचताय काय, कोंबडीला चक्क चार पाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 18:45 IST2018-09-08T18:43:16+5:302018-09-08T18:45:12+5:30

आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

wonder in Pune, the chicken has four feet! | अहो, वाचताय काय, कोंबडीला चक्क चार पाय !

अहो, वाचताय काय, कोंबडीला चक्क चार पाय !

निगडी : आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. असेच काहीसे वैशिष्ट्य असलेली कोंबडी पिंपरी-चिंचवडमधील निगडीत आहे. या कोंबडीला चक्क चार पाय आहेत.एका विक्रेत्याकडे ही कोंबडी आढळून आली. कोंबडीला चार पाय असल्याची चर्चा होताच या कोंबडीला पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.

हाक देणारे, झुंज खेळणाऱ्या कोंबड्यांबाबत आपण ऐकले होते. परंतु  चार पायांची  दुर्मिळ कोंबडी निगडी येथे आढळून आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. निगडीतील  कुतबुद्दीन होबळे यांनी  शनिवारी सकाळी ७० कोंबड्या खरेदी केल्या. त्यातील एका कोंबडीला चार पाय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी इतरांनाही सांगितले. बघता बघता ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि ही चार पायाची कोंबडी पाहण्यासाठी गर्दी उसळली.कोंबडीला चार पाय कसे, असा प्रश्न उपस्थित करून अनेक जण उत्सुकतेपाटी ही कोंबडी पाहण्यासाठी होबळे यांच्या निगडीतील दुकानात गर्दी करीत आहेत.

           चार पायांची कोंबडी पहिल्यांदाच माझ्या पाहण्यात आली. कोंबडीला चार पाय असणे जणू नैसर्गिक चमत्कारच आहे. सकाळपासून आमच्याकडे ही कोंबडी पाहण्यासाठी लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक गर्दी करीत आहेत. पहिल्यांदाच अशी कोंबडी पाहिल्याने मी तिचे संगोपन करणार आहे अशी माहिती कुतबुद्दीन  होबळे यांनी दिली. 

Web Title: wonder in Pune, the chicken has four feet!