मध्यरात्री महिलांचा प्रवास धोकादायक

By Admin | Updated: December 16, 2014 03:57 IST2014-12-16T03:57:42+5:302014-12-16T03:57:42+5:30

रात्री-अपरात्री मुंबईतील प्रवास दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो; तरीही एकट्या दुकट्या महिलेवर घराबाहेर पडून प्रवास करण्याची वेळ ओढवलीच तर

Women's journey in the middle of the night is dangerous | मध्यरात्री महिलांचा प्रवास धोकादायक

मध्यरात्री महिलांचा प्रवास धोकादायक

टीम लोकमत, मुंबई
रात्री-अपरात्री मुंबईतील प्रवास दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो; तरीही एकट्या दुकट्या महिलेवर घराबाहेर पडून प्रवास करण्याची वेळ ओढवलीच तर तिचा प्रवास सुरक्षित होईल, बिनधोकपणे ती प्रवास करेल याची शाश्वती ठामपणे देता येत नाही. ‘टीम लोकमत’ने केलेल्या ‘मेगा स्टिंग आॅपरेशन’मध्येही मुंबईतला मध्यरात्रीनंतरचा प्रवास एकट्यादुकट्या महिलेसाठी सुरक्षित नसल्याचेच स्पष्ट झाले.
या आॅपरेशनमध्ये ‘लोकमत’च्या चार महिला प्रतिनिधींनी १४ डिसेंबरच्या मध्यरात्री एक ते चार या वेळेत सायन ते वांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी), बीकेसी ते वांद्रे टर्मिनस, वांद्रे टर्मिनस ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), एलटीटी ते भक्ती पार्क, भक्ती पार्क ते शिवडी फाटक, शिवडी ते भायखळा रेल्वे स्थानक या विविध रस्त्यांवरून रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांमधून स्वतंत्रपणे प्रवास केला. या महिला रिपोर्टर्सना ‘लोकमत’च्या अन्य ८ रिपोर्टर्सनी आणि ३ फोटोग्राफर्सनी योग्य रणनीती.

Web Title: Women's journey in the middle of the night is dangerous