महिला आयोगाची रामदेव बाबा यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:06 IST2022-11-26T12:06:00+5:302022-11-26T12:06:47+5:30

या वक्तव्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दाेन दिवसांच्या आत खुलासा पाठविण्याची नाेटीस दिली आहे.  

Women Commission notice to Ramdev Baba | महिला आयोगाची रामदेव बाबा यांना नोटीस

महिला आयोगाची रामदेव बाबा यांना नोटीस

मुंबई : ठाण्यातील योग शिबिरात रामदेवबाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्य महिला आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली आहे. आपले वक्तव्य महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. आपल्या वक्तव्याने सोशल मीडियात विविध स्तरांतील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे तक्रारदारांनी म्हटल्याचे निवेदन महिला आयाेगाने जारी केले  आहे. 

या वक्तव्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून रामदेवबाबा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दाेन दिवसांच्या आत खुलासा पाठविण्याची नाेटीस दिली आहे.  राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसने वक्तव्याचा निषेध करत आंदाेलनाचा इशारा दिला आहे.
 

 

Web Title: Women Commission notice to Ramdev Baba