शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भावजयीच्या नावावर महिलेने केली तब्बल २५ वर्षे नोकरी; विधानसभेत धक्कादायक बाब उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:28 IST

बनावट कागदपत्रांद्वारे अंगणवाडीमध्ये मदतनीस, २ अधिकारी निलंबित

मुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात एका अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून एका महिलेने तिच्या भावजयीच्या नावावर २५ वर्षे नोकरी केल्याची धक्कादायक बाब सोमवारी विधानसभेत समोर आली. या प्रकरणी तक्रार येऊनही कारवाई न केल्याने स्थानिक बालकल्याण प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित केल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

शिंदेसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. शांता तडवी हिची भावजय सुमित्रा तडवी हिने अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी मिळविली, त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ही अंगणवाडी तडवी परिवाराच्या घरातच चालत असे. शांताबाईंचे निधन झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये तिच्या मुलाने तक्रार केली; पण त्या तक्रारीची दखल तर घेतली गेली नाहीच, पण शांताबाईंच्या मृत्यूनंतरही सुमित्रा यांना पगार चालूच ठेवला गेला, असा आरोप पाडवी यांनी केला.  

तेलात भेसळ तरी कारवाई नाही, २ अधिकारी निलंबितअक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील व्यापारी महेश तंवर आणि रमेश तंवर यांच्याकडील तेलांमध्ये भेसळ आढळूनही कारवाई न केल्याबद्दल नाशिकचे सहआयुक्त महेश चौधरी आणि धुळे येथील सहायक आयुक्त संदीप देवरे यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत ही घोषणा केली. तसेच तेलाचा कारखानादेखील बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासात शिंदेसेनेचे आमश्या पाडवी यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. तंवर यांच्या मे. गोपाल प्रोव्हिजनमधील तेलाच्या नमुन्यात भेसळ आढळल्याचे मंत्री झिरवाळ यांनी मान्य केले. 

आक्रमकतेने विचारला जाब   मंत्री तटकरे यांनी सांगितले, या प्रकरणी चौकशी सुरू केली. एफआयआर दाखल झाला, योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र या उत्तराने समाधान न झालेल्या सदस्यांनी आक्रमक होत जाब विचारला.

सत्ताधारी आमदारांकडूनच केली गेली मंत्र्यांची कोंडीभाजपचे हरीश पिंपळे, सुरेश धस आणि स्वत: आमश्या पाडवी यांनी प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली. बनावट कागदपत्रांआधारे सुमित्रा तडवी यांनी नोकरी मिळविली, हा गैरप्रकार होण्यास हे दोन अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा असे ते म्हणाले. सत्ता पक्षाचे आमदार हे मंत्र्यांची कोंडी करीत असल्याचे चित्र या निमित्ताने सभागृहात बघायला मिळाले. शेवटी चौकशी पूर्ण होईपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री तटकरे यांनी केली.