VIDEO:"तुझे तुकडे करुन फेकून देईन, जाऊन पंतप्रधानांना विचार..."; तिकीट मागताच महिलेची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:27 IST2025-04-10T14:19:39+5:302025-04-10T14:27:47+5:30

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका महिलेने पोलिसांशी अरेरावी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Woman was travelling in the AC coach of the train TTE asked for the ticket she started abusing him | VIDEO:"तुझे तुकडे करुन फेकून देईन, जाऊन पंतप्रधानांना विचार..."; तिकीट मागताच महिलेची धमकी

VIDEO:"तुझे तुकडे करुन फेकून देईन, जाऊन पंतप्रधानांना विचार..."; तिकीट मागताच महिलेची धमकी

Vidarbha Express: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बुरखा घातलेली एक महिला ट्रेनच्या एसी कोचमध्ये गोंधळ घालताना दिसत आहे. टीसीने तिकीटाबद्दल विचारल्यावर महिलेने अरेरावी करत धमकी देऊन टाकली. तिकीट दाखवत नसल्याने प्रवाशांनी आणि टीटीईने तिला खाली उतरण्यास सांगितले तेव्हा तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रेल्वे पोलिसांनाही न जुमानता या महिलेने तिकीट दाखवले नाही आणि वाद घालणं सुरुच ठेवलं. यावेळी महिलेने प्रवाशांनाही धमकावलं.

विदर्भ सुपर फास्ट एक्सप्रेस ट्रेनमध्ये बुरखा घातलेल्या एका महिलेने रेल्वे पोलिसांशी गैरवर्तन केले. त्यानंतर आता पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ती महिला तिकिटाशिवाय सेकंड एसी कोचमध्ये प्रवास करत होती. जेव्हा टीटीने तिकीट मागितले तेव्हा महिलेने त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर एका प्रवाशाला तुझे तुकडे करून फेकून देण्याची धमकीही दिली. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद करण्यात आला.

सोमवारी ७ एप्रिल रोजी विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेसच्या सेकंड एसी कोचमध्ये हा सगळा प्रकार घडला. तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या एका बुरखाधारी महिलेने टीटीई, रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफशी गैरवर्तन केले. महिलेने रेल्वे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि त्यांचे तुकडे करून फेकून देण्याची धमकी दिली. या घटनेनंतर आरपीएफने अकोला आणि शेगाव स्थानकांवर कारवाई केली आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोमवारी डीएससीआर भुसावळकडूनअकोला येथील आरपीएफला विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेसच्या कोच ए१ मधील ड्युटीवर असलेल्या टीटीईला मदतीची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली. सीटी अमोल कुकडेकर यांनी ही माहिती प्लॅटफॉर्म स्टाफ कॉन्स्टेबल वाघ आणि एएसआय चांदूरकर यांना दिली. हे दोघेही ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंग ड्युटीवर होते. रात्री २१:०५ वाजता जेव्हा ट्रेन अकोला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पोहोचली तेव्हा कॉन्स्टेबल वाघ आणि एएसआय चांदुरकर यांनी कोच ए १ मध्ये जाऊन चौकशी सुरू केली.

यावेळी टीटीईने पोलिसांना सांगितले की धामणगावहून प्रवास करणारी एक महिला सीट क्रमांक ४९ वर बसली होती. तिकीट मागितले असता महिलेने दाखवण्यास नकार दिला आणि बर्थ रिकामी करण्यासही नकार दिला. यानंतर ती शिवीगाळ करु लागली आणि धमक्या देऊ लागली. यावेळी सर्वानी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने कोणाचेच ऐकलं नाही.


त्यावेळी ट्रेनमध्ये महिला कर्मचारी उपस्थित नसल्याने पोलिसांनी भुसावळ येथे कळवले आणि शेगाव स्थानकात महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोलवण्यात आले. शेगावला ट्रेन पोहोचली तेव्हा महिला पोलीस निकिता तेलगोटे आणि टीसी कविता पवार यांनी महिलेला खाली उतरवले. रात्री ती एकटी असल्याने तिला ताब्यात घेण्यात आले नाही.  त्यानंतर आरपीएफने एका महिला कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 

Web Title: Woman was travelling in the AC coach of the train TTE asked for the ticket she started abusing him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.