“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:37 IST2025-08-10T11:37:39+5:302025-08-10T11:37:53+5:30

Sharad Pawar News: एकनाथ शिंदेंना खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल, असा मोठा दावा शरद पवारांनी केला.

without mentioned pm narendra modi senior leader sharad pawar said rss is disciplined organization and will abide by condition for 75 years age rule | “RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!

“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!

Sharad Pawar News: आम्ही विचारांसोबत जातो. भाजपासोबत कुणी जात असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नाही. आमच्याकडे दुसऱ्या फळीत सर्वच व्यक्ती पक्षाला मजबूत करण्यासाठी सक्षम आहे. कुणीच कमजोर नाही, राहुल गांधी यांनी पॉवर पॉइंटद्वारे प्रेझेंटेशन केले. जसे आपण सिनेमा पाहायला मागे बसतो, तेव्हा तो अधिक स्पष्ट दिसतो. त्याच पद्धतीने मी व उद्धव ठाकरे मागे जाऊन बसलो, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी सविस्तर आणि स्पष्ट भाष्य केले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यापूर्वी दिल्लीत दोन लोक मला भेटायला आले. त्यांची नावे आता माझ्याकडे नाहीत. त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात २८८ जागा आहेत. आम्ही तुम्हाला (महाविकास आघाडी) १६० जागा निवडून येण्याची हमी देतो. त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर आपण त्यांची भेट राहुल गांधी यांच्याशी घालून दिली; पण त्यावेळी राहुल गांधी व मी दोघांनीही हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळवू, असा निर्णय घेतला, असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ७५ वर्षांचे होत असून, निवृत्तीबाबत सुरू असलेल्या राजकीय वर्तुळातील चर्चांवर शरद पवार यांनी संघाला टोला लगावत, नियम पालनाची अपेक्षा व्यक्त केली.

७५ वर्षे अटीचे आरएसएस पालन करेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७५ वर्षांचे होत आहेत, याबाबत विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस (RSS) ही शिस्तबद्ध संघटना आहे. एकदा निर्णय झाला तर त्याची चर्चा होत नाही, अंमलबजावणी होत असते. ७५ वर्षे निवृत्ती वयाच्या बाबतीत शिस्तीचे पालन होईल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून परतले. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, मी शिंदेंना खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांचा एक स्वभाव आहे, ते कधीच बोलत नाहीत. त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याचा अंदाज लवकरच येईल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शरद पवार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. आमची वाटचाल जी आहे ती बाळासाहेबांचे विचार आणि विकास यांची आहे. मी दिल्लीत कुठे गेलो होतो हे सगळ्यांना माहिती आहे. मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. आमची वाटचाल सरळ आहे, आम्ही कधीच तिरकस जात नाही. 

 

Web Title: without mentioned pm narendra modi senior leader sharad pawar said rss is disciplined organization and will abide by condition for 75 years age rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.