तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:04 IST2025-01-30T15:03:00+5:302025-01-30T15:04:39+5:30
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात मांडली होती.

तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
Devendra fadnavis Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. संतोष देशमुख हत्या, दोन कोटी खंडणी आणि पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मागणी करतानाच सत्ताधारी आणि विरोधकांकडून ही मागणी होती आहे. याबद्दल धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चेंडू ढकलला आहे. याबद्दल आता देवेंद्र फडणवीस विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडेंची आणि तुमची दिल्लीत भेट झाली का? धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागितला तर राजीनामा देणार. तुम्ही मुंडेंचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत विचारण्यात आला.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "असं आहे की, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की, ते त्यांच्या कामासाठी आले होते. मी माझ्या कामाने आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण, सकाळी आमची भेट झाली होती. पण, आमची त्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत भेट झाली होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे", असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राजीनामा देण्याबद्दल धनंजय मुंडे काय म्हणाले आहेत?
२९ जानेवारी रोजी दिल्लीत माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, "याबाबतीत धनंजय मुंडे यासर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) कुठे जर दोषी वाटत असतील, तर त्यांनी राजीनामा मागावा; मी राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे ना", अशी भूमिका धनंजय मुंडेंनी मांडली.