बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:59 IST2026-04-05T14:58:30+5:302026-04-05T14:59:46+5:30
NCP SP Group Shashikant Shinde News: राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली.

बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
NCP SP Group Shashikant Shinde News:बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसची भूमिका हा त्यांचा अधिकार आहे. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्याशी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली आहे. तसेच राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबतही चर्चा केली, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे एक महत्त्वाची बैठक झाली. शरद पवार यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली, याबाबत शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. एकीकडे महायुतीला बारामतीची निवडणूक बिनविरोध करायची आहे, तर दुसरीकडे विरोधक मात्र उमेदवार देण्याबाबत आग्रही भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. यातच शरद पवार यांच्यासोबत पक्ष नेत्यांच्या झालेल्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
राहुरी लढवण्यासासंदर्भात मविआ सोबत चर्चा सुरू
अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बारामती पोटनिवडणूक लढवणार नाही. अजित दादांचे निधन झाले तेव्हाच आम्ही ठरवले की लढवणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी जाहीर केली. तर दुसरीकडे, राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात बैठक झाली. चर्चा करून त्याविषयीचा निर्णय घेतला जाईल. राहुरी लढवण्यासासंदर्भात मविआ सोबत चर्चा सुरू आहे. प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली, ते आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी बोलणे होईल, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरणी कुणी जाणिवपूर्वक हे सीडिआर काढले का. हे सीडीआर कुणी देताय का? ह्याचा खुलासा करणे गरजेचे आहे. सातऱ्यात भाजपाने आमच्या लोकांना फोडले आणि दुसऱ्या पक्षातील लोकांना संधी देत आहेत. कर्णे आणि त्यांच्या पत्नीला ऑफर आहे. १० कोटी आणि सभापती अशी ऑफर दिली जात आहे, असा मोठा दावा शिंदे यांनी यावेळी केला.