शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम क धी मिळणार?

By admin | Updated: July 30, 2014 01:13 IST

उच्च शिक्षणासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम कधी मिळणार असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीच्या फ रकाचा निधी

परिपत्रक असूनही अधिकाऱ्यांची टाळाटाळनागपूर : उच्च शिक्षणासाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम कधी मिळणार असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यावृत्तीच्या फ रकाचा निधी शासनाने मान्य करूनही केवळ अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे ही रक्कम मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत. राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. एमएड अभ्यासक्रमासाठी समाजकल्याण विभागाने सन २०१२ साली १० हजार रुपये शिष्यवृती मंजूर केली होती. महाविद्यालयात लागणाऱ्या शिक्षण शुल्काएवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यावेळी एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क ५० ते ७० हजारांच्या दरम्यान होते. यामुळे शासनाने मंजूर केलेली शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांनी नाकारली. एमएड महाविद्यालयांनी ती स्वीकारली नाही. मात्र काही महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे १० हजार घेतले. यानंतर शासनाने एका अध्यादेशानुसार शिष्यवृत्ती म्हणून संपूर्ण शिक्षण शुल्क मंजूर केले. सोबतच शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम देखील देण्याचे शासनाने मान्य केले. ज्या महाविद्यालयांनी १० हजार रुपये घेतले होते अशा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ही रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. सन २०१२ साली मान्य झालेली शिष्यवृतीची तफावत महाविद्यालयांना अद्याप मिळाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे महाविद्यालयात अडकून पडली आहेत. नागपुरातील एका महाविद्यालयाचा यात समावेश आहे. आपली कागदपत्रे मिळवी यासाठी विद्यार्थी प्रयत्न करीत असताना पूर्ण शिष्यवृती मिळाल्याशिवाय कागदपत्रे देता येणार नाहीत असे महाविद्यालयांनी सांगितले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, समाजकल्याण आयुक्त यांनादेखील निवेदने सादर केली. शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम शासनाने मान्य केली असताना केवळ अधिकारी कोणत्या पद्धतीने फरकाची रक्कम द्यावी याबाबत शासनाने आदेश दिले नसल्याचा हवाला विद्यार्थ्यांना देत आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना निवेदने दिली आहेत. याबाबत त्यांच्याकडूनही पत्र व्यवहार झाल्यावर देखील अधिकारी कार्यवाही करीत नसल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहेत. (प्रतिनिधी)