राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:07 PM2022-11-28T15:07:43+5:302022-11-28T16:05:21+5:30

सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Will Governor Bhagatsinh Koshyari be relieved of office? Source information | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

googlenewsNext

मुंबईःमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागे एकदा सावित्रीबाई फुले आणि अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आणि अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता स्वतः कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारीमहाराष्ट्रातील जनतेला दुखावणारी वक्तव्ये करत आहेत. सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, गुजरातींचा पैसा काढून घेतला तर मुंबईत काही उतरणार नाही आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल विरोधकांसह राज्यातील जनतेच्या निशाण्यावर आले आहेत. 

विविध स्तरातून राज्यपालांना तीव्र विरोध होत आहे, तसचे काहीजण त्यांची हकालपट्टी करण्याची भाषा करत आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात येत आहे. त्यांना आपल्या गृहराज्यात जाऊन पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याची इच्छा असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या वृत्तांना राज्यपालांकडून दुजोरा आलेला नाही.

Web Title: Will Governor Bhagatsinh Koshyari be relieved of office? Source information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.