शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:45 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

कारंजा लाड (वाशिम) : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधाऱ्यांनी केले होते. या तिघांनी भाजपात प्रवेश घेताच आरोपांचे सत्र थांबविण्यात आले. संबंधितांनी खरोखरच भ्रष्टाचार केला असेल तर त्यांचे पितळ भाजपा आता उघडे पाडणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयासमोरच्या प्रांगणात मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपा सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख संयोजक तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, डॉ. श्याम जाधव नाईक, संतोष कोरपे, प्रकाश गजभिये, संजय खोडके, संग्राम गावंडे, महेबुब शेख, माधवराव अंभोरे, अंकुश देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेत लाखो विहिरी, शेततळे उभारण्यात आल्याचे सांगितले; मात्र या विहिरी कुणालाच दिसत नसल्याने त्या कदाचित गुप्त विहिरी असाव्या, ज्या केवळ भाजपाच्याच कार्यकर्त्यांना दिसतात, असा टोल मुंडे यांनी यावेळी लगावला. जलयुक्त शिवार अभियान, वृक्षलागवड योजना सपशेल अपयशी ठरली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ठणकावून सांगतात, की ३८ कोटी वृक्ष लावण्यात आली; परंतु हे वृक्ष भाजपाच्या पुण्यवंत कार्यकर्त्यांनाच दिसत असतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले, विद्यमान सरकारच्या काळात एकट्या महाराष्ट्रात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्याचे पाप भाजपा सरकारला निश्चितपणे लागणार असल्याचे अजीत पवार म्हणाले. भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला आता सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. समारोपीय भाषणातून त्यांनी राज्यातील युती सरकारच्या धोरणावर तिखट शब्दांत टिका केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेwashimवाशिमBJPभाजपाPoliticsराजकारण