शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

पंकजा घेणार धनंजय मुंडेंची जागा ? विरोधीपक्ष नेतेपदी लागू शकते वर्णी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:23 PM

भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चांना उधाण आले आहे. पंकजा यांनी देखील आपण 12 डिसेंबरला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले. त्यांच्या या पावित्र्यामुळे भाजपकडून त्यांची वर्णी विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी लागू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत. 

राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरूनही भारतीय जनता पक्षावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. भाजपने नरमाईची भूमिका न घेतल्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजप विरोधात बसले असून  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली आहे. 

दरम्यान भाजप सत्तेत येऊ न शकल्याने माजीमंत्री पंकजा मुंडे पेचात अडकल्या आहेत. या संदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांना विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदाची संधी मिळू शकते. 

याआधी धनंजय मुंडे विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी होते. धनंजय मुंडे यांना या पदाचा राज्यभर आपला संपर्क निर्माण करण्यासाठी फायदा झाला होता. किंबहुना परळीतून विजय मिळवणे त्यांना सोपे झाले होते. आता भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे.