शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता मेघे होणार भाजपवासी ?

By admin | Updated: June 1, 2014 01:05 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विविध जबाबदार्‍या पार पाडल्यानंतर आता माजी खा. दत्ता मेघे हे भाजपवासी होण्याच्या मार्गावर आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाज

गडकरींचा मैत्रीचा हात : दोन दिवसात निर्णयकमलेश वानखेडे  - नागपूरकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विविध जबाबदार्‍या पार पाडल्यानंतर आता माजी खा.  दत्ता मेघे हे भाजपवासी होण्याच्या मार्गावर आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि  जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना ‘मैत्री’चा हात देणार अहेत.  गडकरी-मेघे यांची  उद्या, रविवारी बैठक होणार असून त्यात मेघेंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल व दोन  दिवसात तशी रितसर घोषणा होईल, अशी  विश्‍वसनीय माहिती भाजपच्या गोटातील सूत्रांनी दिली  आहे. याबाबत मेघे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गडकरी व मेघे यांचे जुने, जिव्हाळ्याचे व राजकारणापलिकडील संबंध आहेत. या निवडणुकीत  मेघे यांचे पुत्र सागर यांनी वर्धेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यांना पराभवाला  सामोरे जावे लागले. या निवडणुकीपूर्वी मेघे यांनी भाजपमध्ये येऊन सागर यांना वर्धेत भाजपकडून  लढवावे, असा गडकरींचा आग्रह होता. पक्षाच्या संसदीय मंडळात गडकरींनी आपले वजन  वापरून वर्धेचा निर्णय थांबवून ठेवला होता. दत्ता मेघेही त्यासाठी तयार होते. मात्र, ‘बाबां’च्या  प्रेमात सागर यांनी काँग्रेसकडून लढण्याला अधिक पसंती दर्शविली. त्यावेळी त्यांना मोदी लाटेचा  अंदाज आला नाही. सागरात लाट येते. पण लाटेत सागर वाहून गेले. दत्ताभाऊ थकले आहेत. सागर  यांच्या दारुण पराभवाचा त्यांना जबर धक्का बसला आहे. अशात पुन्हा एकदा गडकरीत दडलेल्या  त्यांच्या मित्राने त्यांच्यासाठी  मदतीचा हात पुढे केला आहे. सागर यापूर्वी भाजपकडून विधान परिषदेत निवडून गेले होते. त्यावेळीही गडकरींनीच त्यांना मदत  केली होती.   मात्र, दत्ताभाऊ काँग्रेसमध्ये होते. यानंतर मध्येच सागर यांनी आमदारकीचा राजीनामा  देत भाजपला रामराम केला. हा प्रकार गडकरींसह भाजपमधील अनेकांना खटकला होता. आता  वर्धेतील पराभवानंतर दत्ताभाऊ भाजपवासी होणार असल्याच्या चर्चेमुळे भाजपमध्ये दबक्या  आवाजात जुना इतिहास चर्चिला जात आहे. एकेकाळी शरद पवार यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जाणारे दत्ता मेघे यांनी पवार यांच्यासोबत  काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ सोडत पुन्हा  काँग्रेसचा मार्ग धरला. वर्धेतून लोकसभा लढले व खासदार झाले. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हाच त्यांचे भाजप  प्रवेशाचे ठरले होते. राज्यसभाही निश्‍चित झाली होती. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी लालकृष्ण  अडवाणींना फोन करून तासाभरात खेळ केला व तिकीट कापले, असे राजकीय सूत्रांकडून  सांगितले जाते. तेव्हा जे हुकले ते आता साध्य होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर गडकरी- मेघे  यांच्या ‘राजकीय’ मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे पहायला मिळेल.     समीर लढणार विधानसभादत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांचे छोटे पुत्र समीर हे भाजपकडून विधानसभा  निवडणूक लढतील, अशी  माहिती आहे. समीर यांच्यापुढे तूर्तास पश्‍चिम किंवा मध्य नागपूरचा  पर्याय आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेकडे असलेली दक्षिण  नागपूरची जागा आपल्या कोट्यात आणण्यात भाजपला यश मिळाले तर समीर दक्षिणमधून  रिंगणात दिसू शकतात.