शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?, शेलारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:27 PM

ज्यांना कमी गुण पडले आहेत, असे वाटत असेल त्यांना नंतर परीक्षा देऊन गुण वाढविण्याची संधी दिली जाईल, असा निर्णय आपण घेतला.

मुंबई- आम्हाला "कोरोना ग्रॅज्युएट" तर संबोधले जाणार नाही ना? आम्हाला अशा नव्या बिरुदावलीने तर ओळखले जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार ऍड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात आमदार ऍड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता मागील शैक्षणिक वर्षातील पडलेल्या गुणांची सरासरी काढून पास केले जाणार आहे. ज्यांना कमी गुण पडले आहेत, असे वाटत असेल त्यांना नंतर परीक्षा देऊन गुण वाढविण्याची संधी दिली जाईल, असा निर्णय आपण घेतला.हा निर्णय आपण विद्यार्थी हित व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता या भूमिकेतून घेतलेला आहे. विद्यार्थी हित हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आरोग्याचे हित जपताना शैक्षणिक आरोग्य ही महत्त्वाचे आहे. या निर्णयावर आम्ही भाष्य न करता तुम्ही घेतलेल्या भूमिकेशीच आमची भूमिका मिळतीजुळती आहे. हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना वाटते आहे की, आम्हाला "कोरोना ग्रॅज्युएट" तर संबोधले जाणार नाही ना? या सह काही प्रश्न या निर्णयाबाबत उपस्थितीत होतात.विद्यार्थ्यांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या अशा प्रश्नांची तातडीने उत्तरे देऊन या निर्णयात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपताना त्याचे आरोग्य हित जपताना त्याचे शैक्षणिक आरोग्य ही जपले जाईल, असे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना चिंता मुक्त केले पाहिजे म्हणून खालील प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिले आहेत.उपस्थित केलेले प्रश्न• राज्यातील विद्यापीठांमध्ये ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? ATKT चे विद्यार्थी हे नापास गृहीत धरले जातील. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे याचा विचार केला आहे का? राज्यात सर्व विद्यापीठ मिळून 40 टक्के विद्यार्थी हे ATKT असलेले आहेत.• अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का?• जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅ्ग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? याही प्रवेश परीक्षा रद्द करणार काय? (लॉ, बी.एड. प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.) • हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणा-या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू आहे का?• अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत कुलगुरुंच्या समितीने परीक्षा घेणे शक्य नाही असे म्हटले होते काय?• काही विद्यापीठांमध्ये पहिल्या व दुस-या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेतल्या जातात. अंतिम वर्षांच्या दोन सेमिस्टरच्या परीक्षा हे विद्यापीठ घेते. त्यामुळे महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांवरच कदाचित विद्यार्थ्याला पदवी मिळेल.• पुढील शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम कधी सुरु होणार?• जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुण सुधारणेसाठी (Class Improvement) परीक्षा देणार असतील तर या गुण सुधारणेचा विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फायदा होणार का? देशातील अन्य विद्यापीठांचे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम तोपर्यंत सुरु झाले असतील तर या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.• जर Class Improvement च्या गुणांचा फायदा विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर शैक्षणिक वर्ष डिसेंबर किंवा जानेवारीत सुरु करणार काय?• मागील वर्षाच्या सरासरी गुणांवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता देणार काय?• राज्याबाहेरील विद्यापीठांमध्ये तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या संधी नाकारल्या जाणार नाहीत ना? याचा विचार केला आहे का?• बार कौन्सिल ऑफ इंडिया, फार्मसी कौन्सिल, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरसारख्या पार्लमेंट अॅक्टने स्थापन झालेल्या शिखर संस्था विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारा परवाना देतील काय?• बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच नामांकित फर्ममध्ये तसेच समाजामध्ये सरासरी गुणांमुळे विद्यार्थ्यांकडे वेगळ्या नजरेने (कोरोना पदवी) पाहिले जाईल काय?• विद्यापीठाच्या स्वायत्ततेमध्ये हा सरकारी हस्तक्षेप नाही काय? • विद्यापीठातील सर्व शैक्षणिक घटकांनी एकत्रित विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरले नसते काय?

हेही वाचा

CoronaVirus News: छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSMEsसाठी सरकारकडून 20000 कोटींच्या पॅकेजची घोषणा

CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं

लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर

धक्कादायक... वडिलांनीच पोटच्या तीन लहान मुलींना नदीत फेकून दिलं

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरे