शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय'ची सोय

By admin | Updated: July 4, 2014 09:33 IST

हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय' सेवा उपलब्ध करण्यात आली असून १५ मिनिटांसाठी मोफत वायफाय सेवा असणार असून १८0 तासांसाठी १00 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे.

 १५ मिनिटे मोफत वायफाय सुविधा : १८0 तासांसाठी १00 रुपये शुल्क

मुंबई : मुंबईकरांची वेळ वाचवणारी प्रवासी सेवा देणार्‍या मेट्रो प्रशासनाने वायफाय सुविधाही देण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. त्याची पूर्तता आता मेट्रो प्रशासनाकडून केली जात असून 'हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय' सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. १५ मिनिटांसाठी मोफत वायफाय सेवा असणार असून १८0 तासांसाठी १00 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे.
८ जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. ही सेवा सुरू होताच मुंबईकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मेट्रो सुरू झाल्यापासून दररोज पाच लाख प्रवासी त्यामधून प्रवास करत आहेत. मेट्रो तसेच स्थानकांवर वायफाय नसल्याने नेट सर्फिंग, ट्विट आणि डाऊनलोडिंग प्रवाशांना करता येत नव्हती. त्यामुळे स्थानकांवर वायफाय देण्यात येईल, अशी घोषणाच सुरुवातीला केली होती. प्रवाशांची संख्या आणि त्यांना असणारी गरज पाहता अखेर मेट्रो प्रशासनाने वायफाय सेवा ३ जुलैपासून सुरू केली. मेट्रोच्या बारा स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्ट फोनवर हे वायफाय त्या वेळी उपलब्ध होईल. १५ मिनिटांसाठी वायफाय मोफत असेल. मात्र या वायफायचा फायदा प्रवाशांना स्थानकांवर कायमस्वरूपी पाहिजे असल्यास १00 रुपये कूपन्स घेऊन १८0 तास ही सुविधा मिळवू शकतात. हे कूपन विकत घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वैध असेल, असे या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

स्थानकात असताना वायफाय हवे असल्यास..

प्रवाशांनी आपले इंटरनेट सुरू करावे.

- त्यानंतर wi-fi@mum metro असे टाइप करावे. 
- मेट्रो प्रशासनाने वायफायसाठी youbroadband यांच्याशी टायअप केले असून त्यांची वायफाय सेवा उपलब्ध होईल.

मेट्रो प्रशासनाची चलाखी

- महत्त्वाची बाब म्हणजे वायफाय सुविधा ही मेट्रो रेल्वेत देण्यात आलेली नाही. तर ही सेवा स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रत्यक्षात त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे १00 रुपये कूपन्सची ऑफर ही सुरुवातीला पाच हजार प्रवाशांसाठी वैध असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकदा वायफायचे हे कूपन्स घेतल्यास ते प्रवाशांना परत मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले.

* बुधवारी मेट्रोच्या एका डब्यातील एसीमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याने त्यामधून मोठी गळती झाली होती. या डब्यातील तांत्रिक समस्या सोडवल्यानंतर ही ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणली गेली. मेट्रोकडे ६४ कोच असून प्रत्येक डब्यात दोन एसी युनिट आहेत. असे १२८ एसी युनिट गळतीच्या घटनेनंतर तपासणी करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.