अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीचा खून

By Admin | Updated: September 2, 2015 23:40 IST2015-09-02T23:40:15+5:302015-09-02T23:40:15+5:30

मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील घटना; आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली.

Wife's murder through suspicion of immoral relations | अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीचा खून

अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीचा खून

मलकापूर (बुलडाणा): अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथे मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर तीन तासांनी आरोपीने स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर होऊन, हा थरारक घटनाक्रम सांगितला. आरोपी प्रकाश दामोधर गलवाडे (वय ४३) हा मुळचा देवधाबा येथील रहिवासी असला तरी, दहा ते बारा वर्षे तो पत्नी शारदासोबत बाहेरगावी राहायला होता. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी शारदा ही १ सप्टेंबर रोजी देवधाबा येथे आली आणि मुलाला घेवून परत जाण्याचा प्रयत्न केला. ती वारंवार बाहेरगावी पळून जायची आणि काही दिवसांनी परत यायची. यावेळी तिने मुलाला घेवून बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचा गळा आवळून खून केला, अशी कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी शारदाच्या भुसावळ येथील बहीणीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Wife's murder through suspicion of immoral relations