वेकोलिचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे निधन

By Admin | Updated: June 18, 2014 01:32 IST2014-06-18T01:32:01+5:302014-06-18T01:32:01+5:30

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ८ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये

Wicole president Dinesh Garg dies | वेकोलिचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे निधन

वेकोलिचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे निधन

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष दिनेश गर्ग यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. ८ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अंबाझरी घाटावर सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
हैदराबाद येथे सिंगारेनी कोलयारी कंपनी लिमिटेडच्या बैठकीसाठी गेले असताना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते कोमात असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रदीर्घ उपचारानंतर मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवाला हैदराबाद येथून नागपुरात आणण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. दिनेश गर्ग यांनी १ मे २००७ साली वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात वेकोलिने अनेक मोठ्या प्रकल्पांवर कार्य केले. आपल्या प्रशासकीय कौशल्यासाठी ख्याती मिळविलेल्या दिनेश गर्ग यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९५४ साली झाला. भूगर्भशास्त्र या विषयात एम.एस्सीची पदवी घेतल्यावर ते कोल इंडियात रुजू झाले.
दरम्यानच्या काळात त्यांनी इंग्लंड व अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण प्राप्त केले. नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड, बीसीसीएलमध्येही त्यांनी काम केले.
वेकोलिचे अध्यक्षपद भूषविण्यापूर्वी ते बीसीसीएलमध्ये कार्मिक संचालक पदावर तीन वर्षे कार्यरत होते. ते सिंगारेनी कोलयारी कंपनी लिमिटेडच्या शासकीय संचालक पदावरही कार्यरत होते. कोल इंडियासह देशातील कोळसा खाण क्षेत्रातील अनेक संस्थांसोबत त्यांची नाळ जुळली होती.
कोल इंडियामध्ये ते कायमस्वरूपी निमंत्रित संचालक होते. भारतातील खाण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांनी कोळसा खाणीच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी अनेक देशाचे दौरे केले.(प्रतिनिधी)

Web Title: Wicole president Dinesh Garg dies