शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

अजित पवारांना आतापासूनच साईडलाईन का केलं जातंय? अनिल देशमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 9:32 AM

Anil Deshmukh : युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अकोला : राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचं सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवारांना साईडलाईन केले जाईल, हे सर्वांना माहीत आहे. पण, ते आतापासूनच अजित पवारांना साईडलाईन का केलं जातंय? याचा पेच आम्हालाही पडला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर टीका केली. आमचे सहकारी सरकारमध्ये गेले, हे प्रेमापोटी नाही गेले. ज्याप्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये, म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच, जेलमध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूनच तिकडे गेले, अशी मिष्किल टीकाही अनिल देशमुख यांनी केली. 

याचबरोबर, जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो. आपल्यालाही मंत्री पद मिळाले असते, असा दावा सुद्धा अनिल देशमुख यांनी केला. तसेच, सध्या शेतीसह अन्य ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी महायुतीच्या सरकारकडे वेळ नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न राज्यात आहेत. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी केली आहे. याशिवाय, अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देऊन कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये आणि सोयाबीनला ८ हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. 

गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज - अनिल देशमुख जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच, अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनदरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, असा अमानुष लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुख