कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:23 IST2025-06-28T14:21:26+5:302025-06-28T14:23:26+5:30

trending news: कोल्हापुरी चप्पल भारतात अनेक दशकांपासून बनवल्या जात आहेत.

Why does Kolhapuri Chappal make sound? Know the Reason | कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!

कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!

कोल्हापुरी चप्पल भारतात अनेक दशकांपासून बनवल्या जात आहेत. कुर्ता पायजमापासून धोतरापर्यंत अनेक पोशाखांसोबत कोल्हापुरी चप्पल घालता येते. या चप्पलची रचना इतरांपेक्षा वेगळी आहे. तसेच ही चप्पल बनवण्याची पद्धत देखील पूर्णपणे वेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? एखादा व्यक्ती कोल्हापुरी चप्पल घालून रस्त्याने चालत असेल तर, त्याच्या चप्पलेतून कर्रकर्र असा आवाज का ऐकू येतो? त्याबद्दल आज सविस्तर जाणून घेऊयात. 

प्राडाने त्यांच्या लेटेस्ट स्प्रिंग कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पल देखील लॉन्च केली. त्यानंतर या चप्पलची जगभरात चर्चा रंगली. कारण हा ब्रँड कोल्हापुरी चप्पल १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कोल्हापुरी चप्पल कदाचित जगासाठी नवीन असेल. पण भारतात तेराव्या शतकापासून कोल्हापुरी चप्पलचा बनवल्या जात आहेत. ही चप्पल कोल्हापुरात बनवली केली जाते म्हणून त्याला कोल्हापूरी चप्पल असे म्हटले जाते.

कोल्हापुरी चप्पलची खासियत म्हणजे ती हाताने बनवली जाते. कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी सर्वात प्रथम उन्हात चामडे वाळवले जाते. नंतर नैसर्गिक वनस्पतीचा वापर करून रंगवले जाते. त्यानंतर त्याची डिझाइन तयार केली जाते. शेवटी हाताने शिवली जाते. कोल्हापुरी चप्पल हाताने बनवली जात असली तरी ती वापरायला खूप आरामदायक आहे.

कोल्हापुरी चप्पल आवाज का करतात?
इतर चप्पलच्या तुलनेत कोल्हापुरी चप्पल चालताना कर्रकर्र असा आवाज करतात. या चप्पलच्या तळव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकल्या जातात, असे सांगण्यात येते. या चप्पलचा आवाज ऐकून वन्यप्राणी पळून जायचे म्हणून असे केले जायचे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Why does Kolhapuri Chappal make sound? Know the Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.