शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... ", अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:23 IST

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?, असे सवाल मिटकरी यांनी केले.  या प्रश्नांवरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

"आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले.त्यातील पहिली खुर्ची, सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.आणि दुसरी, आदरणीय दादांची, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

"मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, असेही मिटकरी म्हणाले.

मिटकरींनी हे प्रश्न उपस्थित केले

१. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?

२.सहावी व्यक्ती कुठे गेली?

३.Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?

४. एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?

५.एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?

English
हिंदी सारांश
Web Title : Amol Mitkari raises questions about Ajit Pawar's plane crash.

Web Summary : Amol Mitkari questions the death of Ajit Pawar in a plane crash, citing discrepancies in the number of bodies found and pilot changes. He questions the missing sixth person and lack of burnt paper.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीPlane Crashविमान दुर्घटना