"पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... ", अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 12:23 IST2026-02-01T12:13:03+5:302026-02-01T12:23:45+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

"पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... ", अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?, असे सवाल मिटकरी यांनी केले. या प्रश्नांवरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
"आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले.
त्यातील पहिली खुर्ची, सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी, आदरणीय दादांची, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
"मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, असेही मिटकरी म्हणाले.
मिटकरींनी हे प्रश्न उपस्थित केले
१. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?
२.सहावी व्यक्ती कुठे गेली?
३.Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
४. एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही?
५.एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले 😢
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 1, 2026
त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!
मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच… pic.twitter.com/vkASj7gxVC