शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 10:31 IST

महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत आता स्पष्ट झाली आहे. महायुतीत भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ...

महायुती आणि महाविकास आघाडीतील लढत आता स्पष्ट झाली आहे. महायुतीत भाजपाला १४८, शिंदे शिवसेना ८५ तर अजित पवारांच्या वाट्याला ५१ जागा आल्या आहेत. तर मविआमध्ये काँग्रेस १०२ जागांवर लढत आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८७ जागा मिळाल्या आहेत. पाच जादाचे उमेदवार सोडले तर या जागा २८० होत आहेत. यानुसार मविआने मित्रपक्षांना ८ जागा सोडल्या आहेत. अशातच शिवसेना कोणाची? या अर्धवटच राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर या विधानसभेला मिळणार आहे. 

उद्धव  ठाकरे शिवसेना गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट २८८ पैकी ४७ विधानसभा मतदारसंघांत एकमेकांविरोधात लढणार आहेत. जागावाटपात उद्धव ठाकरेंनी बाजी मारलेली आहे. शिंदेंपेक्षा जास्तीच्या ११ जागा ठाकरे गट लढवत आहे. लोकसभेलाही ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा जास्त जागा लढविल्या होत्या. शिंदे गटापेक्षा जास्त जागा ठाकरे गटाने जिंकल्याही होत्या. परंतू, स्ट्राईक रेट शिंदेंचा चांगला होता, असा दावा करण्यात आला होता. 

आताही विधानसभेला ४७ पैकी शिंदे गट किती आणि ठाकरे गट किती जागा जिंकतो यावरून पुन्हा राजकारण रंगणार आहे. यातही स्ट्राईकरेटचा मुद्दा काढला जाणार आहे. या ४७ मतदारसंघांत ठाकरे गट मशाल आणि शिंदे गट धनुष्यबाण या पारंपरिक चिन्हावर लढणार आहे. 

हे ४७ मतदारसंघ कोणते? 

सांगोला शहाजी बापू पाटील (शिंदे गट) दीपक आबा साळुंखे (ठाकरे गट)

पाटण शंभूराज देसाई (शिंदे गट) हर्षद कदम (ठाकरे गट)

परांडा तानाजी सावंत (शिंदे गट) राहुल ज्ञानेश्वर पाटील (ठाकरे गट)

चोपडा चंद्रकांत सोनवणे (शिंदे गट) राजू तडवी (ठाकरे गट)

बुलढाणा संजय गायकवाड (शिंदे गट) जयश्री शेळके (ठाकरे गट

मेहकर संजय रायमुलकर (शिंदे गट) सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)

सिल्लोड अब्दुल सत्तार (शिंदे गट) सुरेश बनकर (ठाकरे गट)

बाळापूर बळीराम शिरसकर (शिंदे गट) नितीन देशमुख (ठाकरे गट)

पालघर राजेंद्र गावित (शिंदे गट)जयेंद्र दुबळा (ठाकरे गट)

रामटेक आशिष जैस्वाल (शिंदे गट) विशाल बरबटे (ठाकरे गट)

कळमनुरी संतोष बांगर (शिंदे गट) संतोष टारफे (ठाकरे गट)

परभणी आनंद भरोसे (शिंदे गट) राहुल पाटील (ठाकरे गट)

कन्नड संजना जाधव (शिंदे गट) उदयसिंह राजपूत (ठाकरे गट)

औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट (शिंदे गट) राजू शिंदे (ठाकरे गट)

जोगेश्वरी पूर्व मनिषा वायकर (शिंदे गट) अनंत (बाळा) नर (ठाकरे गट)

पैठण विलास भुमरे (शिंदे गट)दत्ता गोर्डे (ठाकरे गट)

वैजापूर रमेश बोरनारे (शिंदे गट) दिनेश परदेशी (ठाकरे गट)

नांदगाव सुहास कांदे (शिंदे गट) गणेश धात्रक (ठाकरे गट)

पालघर राजेंद्र गावित (शिंदे गट)जयेंद्र दुबळा (ठाकरे गट)

बोईसर विलास तरे (शिंदे गट) विश्वास वळवी (ठाकरे गट)

भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिंदे गट) महादेव घाटळ (ठाकरे गट)

कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिंदे गट) सचिन बासरे (ठाकरे गट)

अंबरनाथ बालाजी किणीकर (शिंदे गट) राजेश वानखेडे (ठाकरे गट)

कल्याण ग्रामीण राजेश मोरे (शिंदे गट) सुभाष भोईर (ठाकरे गट)

ओवळा-माजीवडाप्रताप सरनाईक (शिंदे गट) नरेश मणेरा (ठाकरे गट)

कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिंदे गट) केदार दिघे (ठाकरे गट)

मागाठणे प्रकाश सुर्वे (शिंदे गट) उदेश पाटेकर (ठाकरे गट)

भायखळा यामिनी जाधव (शिंदे गट)मनोज जामसुतकर (ठाकरे गट)

विक्रोळीसुवर्णा करंजे (शिंदे गट)सुनील राऊत (ठाकरे गट)

भांडुप पश्चिम अशोक धर्मराज पाटील (शिंदे गट)रमेश कोरगावकर (ठाकरे गट)

दिंडोशी संजय निरुपम (शिंदे गट) सुनील प्रभू (ठाकरे गट)

अंधेरी पूर्व मूरजी पटेल (शिंदे गट) ऋतुजा लटके (ठाकरे गट)

चेंबुर तुकाराम काते (शिंदे गट) प्रकाश फातर्पेकर (ठाकरे गट)

कुर्ला मंगेश कुडाळकर (शिंदे गट) प्रविणा मोरजकर (ठाकरे गट)

माहिमसदा सरवणकर (शिंदे गट)महेश सावंत (ठाकरे गट)

वरळी मिलिंद देवरा (शिंदे गट)आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

कर्जत महेंद्र थोरवे (शिंदे गट)नितीन सावंत (ठाकरे गट)

महाड भरतशेठ गोगावले (शिंदे गट) स्नेहल जगताप (ठाकरे गट)

नेवासा विठ्ठलराव लंघे पाटील (शिंदे गट) शंकरराव गडाख (ठाकरे गट)

उस्मानाबाद अजित पिंगळे (शिंदे गट) कैलास पाटील (ठाकरे गट)

बार्शी राजेंद्र राऊत (शिंदे गट) दिलीप सोपल (ठाकरे गट)

दापोली योगेश कदम (शिंदे गट) संजय कदम (ठाकरे गट)

गुहागर राजेश बेंडल (शिंदे गट) भास्कर जाधव (ठाकरे गट)

रत्नागिरी उदय सामंत (शिंदे गट) सुरेंद्रनाथ (बाळ) माने (ठाकरे गट)

राजापूर किरण सामंत (शिंदे गट) राजन साळवी (ठाकरे गट)

कुडाळ नीलेश राणे (शिंदे गट) वैभव नाईक (ठाकरे गट)

सावंतवाडी दीपक केसरकर (शिंदे गट) राजन तेली (ठाकरे गट)

राधानगरी प्रकाश आबिटकर (शिंदे गट) के. पी. पाटील (ठाकरे गट) 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४