शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

मित्रपक्षाची नाराजी कुणाला भोवणार? काँग्रेसला राष्ट्रवादीची, तर भाजपाला शिवसेनेची साथ मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 1:26 AM

मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी विजय मिळविला होता. त्यामुळे याही निवडणुकीत मोठ्या आत्मविश्वासाने काँग्रेस रिंगणात उतरली आहे.

- विशाल सोनटक्के

नांदेड : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी विजय मिळविला होता़ त्यामुळे याही निवडणुकीत मोठ्या आत्मविश्वासाने काँग्रेस रिंगणात उतरली आहे़ तर दुसरीकडे भाजपाने शिवसेनेचे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरविल्याने नांदेडमधील लढत लक्षवेधी ठरत आहे़ प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सक्रीय सहभाग मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे़ तर चिखलीकर यांना नाराज निष्ठावंत भाजपासह संतप्त शिवसैनिकांचीही मनधरणी करावी लागत आहे़ सध्या ही मते द्विधा मन:स्थितीत काठावर असल्याचे दिसून येते़उमेदवारीसाठी भाजपातील चार -पाच जण प्रयत्नशील होते़ मात्र ऐनवेळी शिवसेनेचे आमदार असलेल्या चिखलीकरांच्या गळ्यात भाजपाने उमेदवारीची माळ टाकली़ यामुळे इच्छुक उमेदवाराबरोबरच भाजपातील निष्ठावंत गटही नाराज आहे़ दुसरीकडे शिवसैनिकातही चिखलीकरांविरोधात खदखद आहे़ शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा न देता मनपा निवडणुकीत चिखलीकरांनी भाजपाच्या प्रचाराची सूत्रे स्वीकारली़ त्यावेळी सेनेच्या जिल्हा प्रमुखासह इतर पदाधिकाऱ्यांनाही चिखलीकरांनी फोडले़ याचाही रोष आहे़ त्यामुळेच हिंगोलीच्या शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जाण्याची नांदेडमधील या नाराज शिवसैनिकांनी तयारी सुरू आहे़ नाराज शिवसैनिकांची मने वळविण्याची कसरत सध्या चिखलीकर करीत आहेत़ काँग्रेसकडून चव्हाण कुटुंबियापैकी एक जण रिंगणात उतरणार हे स्पष्ट असल्याने पक्षाने मागील काही महिन्यापासूनच गाठीभेटी सुरू केल्या होत्या़ त्यामुळे तूर्त तरी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसते़ काँग्रेससमोरही राष्ट्रवादीचा सक्रीय सहभाग मिळविण्याचे आव्हान आहे़ स्थानिक स्वराज्य संस्थात काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वबळ आजमावले़ त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले होते़ अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर व माजीमंत्री गंगाधरराव कुंटूरकर यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेवून चर्चा केली़ दोन्ही नेत्यांनीसंपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे़ प्रत्यक्षात ते कितपत प्रचारातसक्रीय होतात, हे समजण्यासाठीकाही दिवस वाट पहावी लागेल.कळीचे मुद्देलोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे यंदा प्रथमच तिरंगी सामना रंगला आहे़ या निवडणुकीत आघाडीची मते निर्णायक ठरतील़मतदानासाठी अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी आहे़ या अत्यल्प दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे़नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी माझ्यावर वारंवार विश्वास दाखविला आहे़ काँग्रेससोबत नांदेडकरांचे हे नाते अतुट आहे़ याही निवडणुकीत मतदार काँग्रेसच्याच पाठीशी राहतील़ ज्या पक्षाला स्वत:चा उमेदवार मिळत नाही, ते काँग्रेससोबत काय लढणार? केलेली कामे जनतेत घेवून जाऊ.- अशोक चव्हाण, काँग्रेसभाजपा आणि शिवसेना पक्षश्रेष्ठींनी चर्चा करूनच मला युतीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे़ त्यामुळे दोन्ही पक्ष एकजुटीने प्रचाराला लागलेले दिसतील़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत़ त्यामुळे मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे़- प्रताप पाटील, भाजपा

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक