पुणे - अजितदादांच्या बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाने जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? असा थेट प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताशी संबंधित कनेक्शन नाशिकच्या भोंदूबाबाशी जोडणारा दावा आमदार अमोल मिटकरी यांनी केला. मिटकरींच्या या दाव्यावरून रोहित पवारांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आमदार रोहित पवार म्हणाले की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही. परंतु आमदार अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते असं त्यांनी म्हटलं.
तसेच या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले?, २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
१८, १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ रोजी शिवरात्री, अमावस्या होती. याच काळात अजित पवारांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीबाहेर भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा व्हायची असा दावा आमदार मिटकरी यांनी केला. या पूजेत लिंबू पुजले होते, कुंकू हळद होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून हा अघोरी प्रकार केला गेला होता का? आता व्हीएसआर विमानासोबत या बाबाचे फोटो पाहता त्याचे या कंपनीच्या मालकासोबत राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी असेल सीआयडी असेल त्यांनी या भोंदूबाबाचे २६ ते ३१ जानेवारीपर्यंतचे कॉल डिटेल्स काढावेत. हा कुणाच्या संपर्कात होता हे शोधावे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
Web Summary : Rohit Pawar questions who met 'Bhondu' Kharat at Ajit Dada's bungalow. He demands investigation into Devgiri bungalow visits on January 27. Pawar advises Sunetra Kaki, Parth, and Jay to be cautious, citing current political instability. Amol Mitkari alleges occult practices near Ajit Pawar's properties, demanding investigation into Kharat's contacts.
Web Summary : रोहित पवार ने सवाल किया कि अजित दादा के बंगले पर 'भोंदू' खरात से कौन मिला। उन्होंने 27 जनवरी को देवगिरी बंगले की यात्राओं की जांच की मांग की। पवार ने सुनेत्रा काकी, पार्थ और जय को सतर्क रहने की सलाह दी, मौजूदा राजनीतिक अस्थिरता का हवाला दिया। अमोल मिटकरी ने अजित पवार की संपत्तियों के पास गुप्त प्रथाओं का आरोप लगाया, खरात के संपर्कों की जांच की मांग की।