शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या पर्वाचा ‘किंग’ कोण?

By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST

आयपीएलच्या सातव्या पर्वात रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांदरम्यान अंतिम लढत रंगणार आहे.

आज अंतिम सामना  : केकेआर-किंग्ज इलेव्हनमध्ये काटय़ाची लढत
 
बेंगळुरू : यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखणारा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आयपीएलमध्ये पहिले विजेतेपद पटकाविण्यास उत्सुक आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वात रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांदरम्यान अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निकालानंतर सातव्या पर्वाचा ‘किंग्ज’ कोण ठरणार,  हे स्पष्ट होईल. 
अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या (122 धावा, 58 चेंडू) शतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने प्रथमच आयपीएलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले. गोलंदाजीमध्ये केकेआर संघाची भिस्त सुनील नरेनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. उभय संघांतील खेळाडू संघांचे मालक शाहरुख व प्रीती ङिांटा यांना आयपीएलच्या जेतेपदाची भेट देण्यास उत्सुक आहेत. 
यापूर्वी एकदा जेतेपदाचा मान मिळविणारा कोलकाता संघ पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती 
करण्यास उत्सुक आहे. पंजाब संघ 
प्रथमच अंतिम फेरीत खेळत आहे. केकेआर संघाला पुन्हा जेतेपदाचा मान मिळविण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या मॅक्सवेल, मिलर, मनन व्होरा, कर्णधार जॉर्ज बेली व रिद्धिमान साहा यांना रोखण्याचे आव्हान आहे. मॅक्सवेलने अबुधाबी व कटकमध्ये 9क्पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. मॅक्सवेल केकआर संघासाठी चर्चेचा विषय आहे. 
साखळी फेरीत चमकदार कामगिरी करणा:या पंजाब संघाला गेल्या काही सामन्यांमध्ये मात्र कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. 28 मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या लढतीत केकेआर संघाने पंजाबचा पराभव केला होता. 
पहिल्या सातपैकी केवळ दोन सामने जिंंकणा:या केकेआर संघाने त्यानंतर चमकदार कामगिरी करीत प्लेऑफमध्ये स्थान मिळविले. युसूफ पठाणच्या 22 चेंडूंतील 72 धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआर संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकाविले. केकेआर संघाने सलग 8 सामने जिंंकण्याचा पराक्रम केला. अंतिम लढतीत पंजाब संघाचे पारडे वरचढ भासत असले, तरी केकेआर संघाला कमी लेखता 
येणार नाही. ऑरेंज कॅपधारक रॉबिन उथप्पाकडून केकेआर संघाला चमकदार 
कामगिरीची अपेक्षा आहे. उथप्पाच्या साथीने कर्णधार गौतम गंभीर संघाला चांगली सुरुवात करून देईल, अशी 
आशा आहे. त्यानंतर शकिबुल हसन, रॅन टेन डोएश्चे आणि युसूफ यांच्यावर संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी राहील. 
युसूफ कुठल्याही गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. त्याने जगातील सर्वात वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या एका षटकात 26 धावा वसूल केल्या आहेत. त्याला रोखण्याचे पंजाबच्या गोलंदाजांपुढे आव्हान राहणार आहे. (वृत्तसंस्था)
 
- अंतिम सामन्यात फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. केकेआर संघाला सुनील नरेनकडून  चमकदार कामगिरीची आशा आहे. त्याची साथ देण्यासाठी शकिबुल सज्ज आहे. शकिबुलने या स्पर्धेत मॅक्सवेलला सहा वेळा बाद केले आहे. 
 
- पंजाब संघाची फिरकीची भिस्त अक्षर पटेल व करणवीर सिंग यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्यांनी चेन्नईविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी केली. या दोन्ही फिरकीपटूंना अंतिम सामन्यात संधी मिळेल का, याबाबत उत्सुकता आहे.