मांजा मजबूत असल्याने निवडणुकीत भाजपाचा पतंग उंच उडणार, गिरीश महाजन यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:28 IST2019-01-13T19:26:53+5:302019-01-13T19:28:08+5:30
आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा मांजा मजबूत आहे. त्यामुळे भाजपाचीच पतंग उंच उडणार आहे,असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

मांजा मजबूत असल्याने निवडणुकीत भाजपाचा पतंग उंच उडणार, गिरीश महाजन यांना विश्वास
जळगाव - आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा मांजा मजबूत आहे. त्यामुळे भाजपाचीच पतंग उंच उडणार आहे,असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जळगावात रविवारी युवाशक्ती फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने खान्देश सेंट्रल मैदानावर पतंगोत्सव साजरा झाला. त्याचे उद्घाटन करताना महाजन बोलत होते.
पतंगोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनीही पतंग उडविण्याचा आनंद घेतला. त्यांचा मांजा सांभाळण्याचे काम मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. याशिवाय जिल्हाधिकारी किशोररोज निंबाळकर, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, ललित कोल्हे यांनीही पतंग उडविण्याचा आनंद घेतला. सर्वच पदाधिकारी व अधिकारी यावेळी एकमकोंची पतंग कापताना दिसून आले.
जनजागृतीसाठी प्रशासनाच्यावतीने इव्हीएम आणि ईव्हीपॉट मशीन महोत्सवात ठेवण्यात आले होते.