शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 15:58 IST

सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगीतले

अकोला : राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नागरिक अडचणीत सापडले असताना, राज्य सरकार मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त होते, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश प्रचार प्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी अकोल्यात केला.अकोल्यातील स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगत, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे पूर परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असून, यासंदर्भात सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगीतले. जम्मू- काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध नाही; मात्र जाती-धर्माच्या नावावर राजकारण होऊ नये, देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहीजे, अशी आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. २१ आॅगस्ट रोजी राज्यात ‘इव्हीएम’ विरोधात बिगर राजकीय आंदोलन होणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगीतले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे उपाध्यक्ष श्याम पांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरAkolaअकोलाMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राcongressकाँग्रेस