"विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:11 IST2026-02-14T15:10:03+5:302026-02-14T15:11:43+5:30

उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे. 

"Where and why did this fight with the Assembly Speaker take place?", Sanjay Raut shared a shocking video | "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

"विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

"विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली?", असे म्हणत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही माणसांसोबत दिसत आहेत. यातील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचेही दिसत आहे. 

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. खासदार संजय राऊतांनी एक व्हिडीओ शेअर करत "विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?", असा सवालही केला आहे.

व्हिडीओ एक महिला आणि काही लोक राहुल नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला पकडतात आणि त्याला मारहाण करतात. वाद सुरू झाल्यानंतर राहुल नार्वेकर हे पुढे चालत जातात. ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तसेच निघून जातात. 

 

हा व्हिडीओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील आहे. दुसऱ्याच्या जागेत विनापरवानगी प्रवेश केल्यामुळे हा वाद झाला. जागा मालकाने यावरूनच राहुल नार्वेकर यांना जाब विचारला. त्यानंतर जे घडले ते सगळे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

Web Title : संजय राउत ने वीडियो साझा किया: अध्यक्ष संग मारपीट; नार्वेकर भागे?

Web Summary : संजय राउत ने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर की मारपीट का वीडियो साझा किया। कथित तौर पर अलीबाग में यह घटना हुई, जब नार्वेकर बिना अनुमति के निजी संपत्ति में घुस गए। राउत ने नार्वेकर की हरकतों और घटनास्थल से भागने पर सवाल उठाए।

Web Title : Sanjay Raut Shares Video: Brawl with Speaker; Narwekar Flees?

Web Summary : Sanjay Raut shared a video showing Assembly Speaker Rahul Narwekar in a scuffle. The incident reportedly occurred in Alibag, after Narwekar allegedly entered private property without permission. Raut questioned Narwekar's actions and his departure from the scene.