Ashok Kharat Case: अशोक खरात याची राज्यात कुठे, किती संपत्ती? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सगळी यादीच वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:39 IST2026-03-24T17:36:52+5:302026-03-24T17:39:21+5:30

Ashok Kharat Property Net Worth: भोंदू अशोक खरात याने लोकांना फसवून, बोगस वस्तू विकून प्रचंड मालमत्ता कमावली आहे. त्याच्याकडे असलेल्या सगळ्या मालमत्तांची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगितली.

Where and how much wealth does Ashok Kharat have in the state? Chief Minister Fadnavis read out the entire list in the Assembly | Ashok Kharat Case: अशोक खरात याची राज्यात कुठे, किती संपत्ती? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सगळी यादीच वाचली

Ashok Kharat Case: अशोक खरात याची राज्यात कुठे, किती संपत्ती? मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सगळी यादीच वाचली

Devendra Fadnavis Ashok Kharat: "आरोपीकडे केलेल्या चौकशीत आणि इतर मिळालेल्या माहितीतून आरोपीची संपत्ती कोठे कोठे आहे, याची माहिती संकलित करण्यात आली आहे", असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरातच्या संपत्तीची भलीमोठी यादी वाचून दाखवली. अशोक खरात याच्याकडे १२ तोळे, तर त्याच्या पत्नीकडे २० तोळे सोने असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. 

अशोक खरात महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. आतापर्यंत दाखल करण्यात आलेले गुन्हे, किती महिलांकडून तक्रारी दिल्या गेल्या आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतून राज्याला दिली. 

अशोक खरात याची कुठे, किती आहे संपत्ती? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मिरगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे ३३ एकर जमीन स्वतःच्या नावावर, मिरगावमध्ये फार्महाऊस, पाथर्डी गाव-गव्हाणे गाव (ता. नाशिक) येथे १० एकर जमीन, सिन्नरमध्ये ६ एकर जमीन, शिर्डी (ता. राहता, जि. अहिल्यानगर) येथे साडेचार एकर जमीन स्वतःच्या नावे आहे."

"काकडी (ता. राहता) शिर्डी विमानतळ येथे ५.५ एकर जमीन, पाथर्डी फाटा नाशिक ८०० स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट, मोझर येथे चार गुंठ्याचे चार प्लॉट, आडगाव (ता.जि. नाशिक) पाच गुंठ्यांचा प्लॉट, पनवेलमध्ये चाळीस गुंठ्यांचा प्लॉट, कॅनडा कॉर्नर नाशिकमध्ये १८९ स्क्वेअर फुटाचे कार्यालय आहे", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. 

मुलीच्या नावावरही संपत्ती?

"संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे मुलगी सृष्टी हिच्या नावावर ११ गुंठ्यांचा प्लॉट, पुण्यात मुलीच्या नावावर प्लॉट, नाशिकमधील कर्मयोगी नगरमध्ये एक बंगला, शिर्डीमध्ये पार्टनरशिपमध्ये साई सिल्व्हर मंगल कार्यालय, सिन्नरमध्ये पाच जणांमध्ये मिळून सहा एकर जमीन", अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

"अशोक खरात याच्याकडे १२ तोळे सोने आहे, तर त्याच्या पत्नीकडे २० सोने आहे. पत्नीच्या नावाने असलेल्या डीमॅट अकाऊंटवरून एक ते दोन लाखांची गुंतवणूक, पाच बँक खाती आहेत. आरोपीकडे ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य आहे", अशी माहिती फडणवीसांनी राज्याला दिली. 

 

Web Title : अशोक खरात की संपत्ति मुख्यमंत्री फडणवीस ने विधानसभा में बताई।

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने विधानसभा में अशोक खरात की संपत्ति का खुलासा किया, जिसमें नासिक, शिरडी में जमीन, एक फ्लैट, प्लॉट, कार्यालय स्थान, सोना और निवेश शामिल हैं। जब्त की गई संपत्ति का बाजार मूल्य लगभग ₹40.87 करोड़ है।

Web Title : Ashok Kharat's assets revealed in assembly by CM Fadnavis.

Web Summary : CM Fadnavis disclosed Ashok Kharat's assets in the assembly, including land in Nashik, Shirdi, a flat, plots, office space, gold holdings and investments. The market value of the seized assets is approximately ₹40.87 crore.