पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध लागणार कधी ?

By Admin | Updated: June 21, 2015 01:18 IST2015-06-21T01:18:57+5:302015-06-21T01:18:57+5:30

बंदुकीच्या गोळ््या शरीराला मारू शकतात, विचाराला नाही. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या झाली म्हणून क्रांतीचा जागर कधीच थांबणार नाही,

When will the search of the killers of Panesar? | पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध लागणार कधी ?

पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध लागणार कधी ?

कोल्हापूर : बंदुकीच्या गोळ््या शरीराला मारू शकतात, विचाराला नाही. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या झाली म्हणून क्रांतीचा जागर कधीच थांबणार नाही, असा निर्धार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी केला. दुसऱ्या ‘मॉर्निंग वॉक’द्वारे, पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा, अशी मागणी करण्यात आली. भरपावसात काढण्यात आलेल्या या मॉर्निंग वॉकमध्ये विविध क्षेत्रांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी मुंबईत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यंत्रणेवरील दबाव वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या
२० तारखेला पानसरे ज्या मार्गावरून रोज फिरायला जात होते तिथे फेरी काढून निषेध करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: When will the search of the killers of Panesar?