शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जागेचे हस्तांतरण होणार कधी?

By admin | Updated: December 21, 2014 00:20 IST

उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : शासकीय अनास्थेचा फटकायोगेश पांडे -नागपूरउपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला असून ही रक्कम २५ डिसेंबर पर्यंत भरण्यासंदर्भात शासनाला कळविले आहे. परंतु अद्याप या निधीसंदर्भात अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामाच्या या कासवगतीमुळे महाविद्यालय पुढील शैक्षणिक सत्रात तरी सुरू होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर येथील राजीव गांधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून बाहेर झाले. त्यानंतर उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे ही मागणी जोर धरायला लागली होती. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळायलाच बरीच प्रतीक्षा करावी लागली. ३ जून २०१४ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी कामठी रोड येथील ‘आॅटोमोटिव्ह’ चौकाजवळील मौजा वांजरी परिसरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत ही जागादेखील तंत्रशिक्षण संचालनालयाला मिळालेली नाही. ‘एनआयटी’च्या अखत्यारितील या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातच भाड्याच्या इमारतीत तरी अभ्यासक्रम सुरू होतील, असे आश्वासन तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले होते. परंतु अद्याप जागाच हाती न आल्यामुळे पुढील प्रशासकीय प्रक्रिय अडकलेली आहे. जागा मिळाल्यानंतर ‘एआयसीटीई’ला महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जागा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ताब्यात येणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.या जागेचा दर २६ कोटी ६१ लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. या निधीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या संथगतीमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जागा जरी ताब्यात आली, तरी ‘एआयसीटीई’ची मंजुरी मिळेपर्यंत पुढील शैक्षणिक सत्र सुरू होऊन जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित मुद्यावर शासनाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी बोलणे योग्य होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.