कधी थांबणार शेतकरी आत्महत्या?; सर्वाधिक प्रमाण अमरावती जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:09 AM2022-01-13T08:09:14+5:302022-01-13T08:09:25+5:30

अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे हे सर्व शेतकरी बळी ठरले आहेत. यासाठी शासन - प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे वास्तव आहे.

When will farmer suicide stop ?; The highest proportion is in Amravati district | कधी थांबणार शेतकरी आत्महत्या?; सर्वाधिक प्रमाण अमरावती जिल्ह्यात

कधी थांबणार शेतकरी आत्महत्या?; सर्वाधिक प्रमाण अमरावती जिल्ह्यात

Next

राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांमध्ये सन २०२१मध्ये सर्वाधिक ३५६ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे हे सर्व शेतकरी बळी ठरले आहेत. यासाठी शासन - प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे वास्तव आहे.

वाढले खासगी सावकारांचे कर्ज
शेतीप्रधान जिल्ह्यात कधी पावसाअभावी, तर आता अतिपावसामुळे खरिपासह रब्बीची पिके हातची जाणार, अशी स्थिती आहे. नैसर्गिक आपत्ती, नापिकी व यातून वाढलेले बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुला-मुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, या विवंचनेत बळीराजाचा धीर सुटून मृत्यूला कवटाळत असल्याचे वास्तव आहे.

...ही आहेत कारणे

शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ कर्जबाजारीपणाच कारणीभूत नाही, तर काही प्रकरणांमध्ये विविध आजार, कौटुंबीक वाद, व्यसनाधीनता, बेरोजगारी व गरिबी आदी घटकही जबाबदार असल्याचे निरीक्षण आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत व शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, याकरिता वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: When will farmer suicide stop ?; The highest proportion is in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.